मुंबई - मुंबईत नवाकाळच्या मंत्रालय प्रतिनिधी
राहुल लोंढे यांना खाडिलकर मॅडम यांनी नारळ दिलाय. राहुल लोंढेने अनेक
वेळा अतिरेक केलाय. तशी चर्चा देखील मंत्रालय पत्रकार कक्ष मध्ये आहे.
नवाकाळची हवा घेऊन लोंढे वागायचे. स्वताची मार्केटिंग करण्यातही ते पटाईत
होते.
मुंबईत मटाचा जोर कायम आहे. मटाकडे यंगब्रिगेड
चांगलीच आहे म्हणा.. दिवसेंदिवस हि यंगब्रिगेड अनेक आघाडीच्या ' जेष्ट '
पत्रकारांना टक्कर देत आहे. मटाने आपला ले-आउट पूर्णता बदललाय. सामन्याचे
गजानन सावंत मटा ऑनलाईनला रुजू झाल्यापासून मटाच्या मुंबईच्या , सेनेच्या
राजकीय गोटातल्या ' आतील ' बातम्या मध्ये आणखी भर पडली आहे.
पुढारीतून
सोडून गेलेले ' त्या ' पैकी एक महाराष्ट्र टाइम्स तर एकजण सामन्यात रुजू
झालेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाच्या दिवशी सामनात
इतरांप्रमाणेच अत्यंत शोकाकुल वातावरण होते. डेस्कवर हुंदके देत अनेक जन
काम करीत होते. ' आपले साहेब गेले ' ह्या बातमीचे शीर्षकाकडे पाहून
तेथील अनेकांच्या हृदयाची कोलाहल होत होती, तर शिवसैनिकापर्यंत वेळेत
सामन्याचा अंक जावा यासाठी अवघ्या ५ तासात सामना अंक " प्याकप " करण्यात
आला. मागणी जास्त असल्याने जेणेकरून प्रिंटींगला वेळ ज्यादा जाणार हाच हेतू
.
मुंबई सकाळ आता लवकरच आपला ले-आउट पूर्णता बदलतंय. त्या संबधी एक मिटिंग हि झालीये.
तिकडे रायगड मध्ये कृषीवलला बोनस नाही, काहींचे पगार नाहीत, काहींचे चेक बाउन्स... अश्या असंतोषाचे वातावरणामुळे लवकरच
भगदाड पडणार आहे. डेस्कवरच्या मंडळीनी कृषीवल सोडण्याचा निर्णय घेतलाय.
वाट पाहतात ती योग्य संधीची.
नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रालयातील
पत्रकार सज्ज झाले आहे. तर अनेकजन ' विमान प्रवास ' कोणता आमदार घडवतोय का
? याची वाट पाहतायत.
टीव्ही ९ ने मराठी मीडियात नामचीन होण्याचा चंगच
बांधला आहे. एखाद्या स्टोरीसाठी अपार मेहनत घेतली जात आहे. नव्याने पारख
करून भरती झालेली मंडळी नक्कीच आपला करिष्मा दाखवतील. बुलेटीनची संख्याही
वाढविली असून हिंदी बुलेटीन
हद्दपार करण्यात आली आहे. गांवकरीच्या श्रध्दा पवार टी.व्ही. 9 मध्ये...प्रिंट मीडियातील अनेकजण टी.व्ही.9 च्या वाटेवर..
' दिव्य मराठी मुंबईत येणार ..' अशा आशावाद
मुंबईत अनेकांना आहे. पण ' दिव्य' मुंबईत येण्याची शक्यता तूर्तास तरी
नाहीये. मुंबई, ठाण्याच्या मार्केटमध्ये पुण्यनगरीचा ' जलवा ' कायम आहे.
नारायण...नारायण...आम्ही पुन्हा येतोय...वाट पहा...
Social Plugin
निवेदन
‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com
आता घडेल इतिहास...
सकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का ? मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता ? आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..
बेरक्याचा अर्थ ....
अनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...
आमच्याबद्दल ....
आम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com