शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने यावर्षीपासून ज्येष्ठ संपादकाला पुरस्कार

मुंबई  - ज्येष्ठ व्यंगचित्रकार तथा दै. सामना, मार्मिक’चे संपादक आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने यावर्षीपासून राज्यातील एका ज्येष्ठ संपादकाला पुरस्कार दिला जाणार आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई येथील कार्यालयात गुरुवारी (ता. 22) झालेल्या  कार्रकारिणीच्या  बैठकीत हा निर्णय  घेण्यात आला.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या  निधनाने पत्रकारसृष्टीची मोठी हानी झाली आहे. बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून दरवर्षी राज्यस्तरीय  कार्यक्रमात एका ज्येष्ठ संपादकाला पुरस्काराचे वितरण केले जाईल. रोख 25 हजार रुपये , स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या  पुरस्काराचे स्वरूप असेल, असे ते म्हणाले.
बाळासाहेबांसारख्रा महान तथा झुंजार पत्रकाराला श्रद्धांजली अर्पण करण्रासाठी मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्र राज्य  तथा राज्याबाहेर जिल्हा मराठी पत्रकार संघाने आज  शनिवारी (ता. 24) शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहनही माधवराव अंभोरे, कार्याध्यक्ष किरण नाईक, सरचिटणीस सिद्धार्थ शर्मा आदींनी केले आहे.