बारामतीत शहरात पुढारीच पुढारपण धोक्यात

बारामती - बारामतीत शहरात पुढारी पेपरच पुढारपण आता धोक्यात आल्याची
चिन्हे दिसत आहेत. बारामतीमधील वर्तमानपत्र विक्रेत्यांनी गेल्या 15
दिवसांपासून पुढारीचे अंक न उचल्याने ऐन दिवाळीत पुढारींनी आपले वितरण
प्रतिनिधीनाच स्टाॅल देऊन पुढारीची विक्री सुरू केली आहे. काही
महिन्यापूर्वी सकाळ चे अंक विक्रेत्यांनी टाकणे बंद केल्यावर सकाळला मदत
करण्यासाठी पुढारी वितरण विभागाने अंक वाढवले नाहीत. परंतु आता पुढारी
टाकणे विक्रेत्यांनी बंद केल्यावर सकाळ ने पुढारीला मदत करणे सोडाच परंतु
अंक वाढवून पुढारी वाल्यांना खिजवले आहे. त्यामुळे राज्यात सुरू असलेले
ऊसदर आंदोलनाच्या परखड बातम्या वाचकांपर्यंत पोचल्या नाहीत. या सर्व
कारभार पुण्यातील जोशीकाकांच्या ठाम भूमिकेमुळे सुरू झाल्याचे समजते.
जोशी काका पुढारी दोन रूपयाला असल्यावर 30 टक्के कमिशन देतात. तर तीन
रूपयाला अंक असल्यावर 25 टक्क्यावर बोळवण करतात. त्यामुळे विक्रेते चिडले
आहेत.
         बारामतीतील सक्षम संपादकीय माणुस नसल्याने पुढारीची बारामतीत
चांगलीच गोची झाल्याचे स्पष्ट होते. बारामती कार्यालयाच्या पिचकार्यांनी
रंगलेल्या भिंती व सुजलेला चेहरा घेऊन संगणावर बोटे चाळवत असलेल्या
टायपिस्टवर महाराष्ट्राच्या राजकीय राजधानीतील बातम्या देण्याचा भार
टाकण्यात आल्याने बारामतीच्या सडेतोड बातम्या पुढारीत वाचायला मिळत
नाहीत. पूर्वीचे काका कार्यालयात आठवड्यातून एक दोन वेळाच येत असतात.
मात्र त्यांना का प्रश्न कोणी विचारायला तयार नाही. पुढारीच्या काही
बातमीदारांना आता स्वातंत्र्य मिळाल्याने बारामती पेक्षा खेड्यापाड्यातील
बातमीदारांच्या बातम्या चांगल्या असतात.पुण्यावरून बातमीदारांना सतत ताप
देणारे संपादकीय मंडळीचा वरदहस्त बारामतीतील संगणकाच्या किबोर्ड खडखड
करणार्या बोटांना आहे. असे बोलले जात आहे. यथेच्छ जेवणावळी ओल्या
पार्ट्या करून हवे त्या बातम्या लावण्याची बारामतीतील पुढारीची प्रथा
जूनीच परंतु ही परंपरा आता एका टायपिस्टवर आल्याने पुढारीचे पुढारपण
धोक्यात आले आहे. आता यावर पद्मश्री काय उपाय योजतात. हे देवच जाणे...