आता बेरक्याची जाहीर चर्चा ...

 काहीका असेना,आता बेरक्याची जाहीर चर्चा होवू लागली आहे.मागे काही महिन्यापुर्वी सोलापुरात पत्रकारांसाठी कार्यशाळा झाली होती,त्यात संजय आवटे, डॉ.जयदेव डोळे यांनी बेरक्याबद्दल जाहीर मत मांडले होते.आता गिरीश कुबेर यांनीही पुण्यात उल्लेख केला.कुबेरांनी आम्हाला वाईट म्हटले नाही,मात्र वाईट याचे वाटले,आमच्याबद्दल शंका उपस्थित केली.
बेरक्या ब्लॉगला 21 मार्च 2013 रोजी दोन वर्षे पुर्ण होत आहेत. दोन वर्षाच्या आत सात लाखाचा टप्पा ऑलरेडी पार केलेला आहे. अनेक ठिकाणी पत्रकार संघटना खिळखिळ्या झालेल्या आहेत. आपसातील मतभेदामुळे पत्रकारांना आधार मिळत नाही.बेरक्याच्या रूपाने पत्रकारांना आधार मिळाला आहे.अनेकांना आमच्यामुळे न्याय मिळाला आहे.खंत ऐवढीच वाटते, आमच्यामुळे काहीजण मोठे झाले, त्यांना न्याय मिळाला,परंतु नंतर आमच्याशी गद्दार झाले.या गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम आम्ही आगामी काळात करणार आहोत.
असो, बेरक्याने पत्रकारांच्या कल्याणासाठी, त्यांना संकट काळात मदत करण्यासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय,अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी शिवधनुष्य उचलले आहे,मग आम्हाला कोणी साथ देवो अथवा न देवो...