
टी.व्ही. 9 मध्ये नव्याने भरती केलेल्या अनेक उमेदवारांना अजूनही कामावर रुजू करण्यात न आल्याने अनेकांची डोकेदुखी वाढलीये. त्यातच वृत्तसमन्वयक तुलसीदास भोईटे यांनी टीव्ही
9 ला रामराम ठोकल्याने या नव्या उमेदवारांची चांगलीच पंचायीत झाली
आहे.कारण त्यांनीच या नव्या मंडळींच्या मुलाखती घेतल्या आहेत. टी.व्ही.9 लवकरच मराठी बातम्या 24 तास करणार आहे.मात्र इनपूट आणि आऊटपूटसाठी हेड म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आली आहे, ते हिंदी भाषिक आहेत.मराठी चॅनेलसाठी हिंदीवाल्यांचा भरणा अधिक झाल्याने भोईटे कमालीचे अस्वस्थ झाले होते.त्यामुळे त्यांनी नाराजीतून राजीनामा दिल्याची खबर आहे.भोईटेंच्या राजीनाम्यामुळे टी.व्ही.9 ला लॉचिंगपुर्वीच दणका बसला आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रालयातील पत्रकार नागपुरात दाखल झालेत. '
गुलाबी थंडी' ची मजा लुटायला अनेक हौशे पत्रकार मुंबईतून ' विदर्भ
एक्प्रेस' मध्ये बसताना चांगलेच प्रफुल्लीत होते.गोंडखैरी येथील देशोन्नती पिंट्रिंग
प्रेससमोर सोबत आणलेल्या बंदूकधारी सुरक्षा गार्डला जुना सुरक्षा गार्ड
राजेंद्र दुपारे याच्यावर गोळी झाडण्याचा आदेश देऊन, त्याचा खून केल्याच्या
आरोप प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. प्रसन्ना वराळे यांच्या एकलपीठाने
देशोन्नतीचे एडिटर इन चीफ आरोपी प्रकाश गोपाळराव पोहरे यांचा जामीन अर्ज
फेटाळून लावल्याने देशोन्नतीच्या डेस्कवर अस्वस्था आहे. तर पुढे आपल्या
दैनिकाचे काय होणार ? याची चिंता काही बहाद्दरांना पडलीये.
मुंबईत इंग्रजी
दैनिकांतहि बर्याच घडामोडी घडल्यात. द एशियन एज मधील कर्मचार्यांना अद्यापही दीपावलीचा बोनस मिळाला नसून अनेकांचे पगारही थकले आहेत. तिकडे मिड-डे दैनिकाची
टाईम्स ऑफ इंडिया , मुंबई मिररशी कडवी झुंज सुरु आहे. मिड-डे चे आपले '
स्टिंग ऑपरेशन ' आणि जगावेगळे काही करण्याची धमक कायम आहे. हिंदुस्तान टाईम्सने आपल्या लेआउटचा अटकेपार झेंडा फडकवला आहे. अप्रतिम वृत्तसंपादन, बातम्यांची उत्तम सांगड खासच ! हिंदुस्तान टाईम्सचा याबाबतीत कोणतेही दैनिक हात धरू शकत नाही हे तितकेच खरे आहे म्हणा ...
सकाळच्या बेलापूर मुख्य कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता,
नवीन जागा न भरल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असल्याचे
बेरक्याच्या कानी आले आहे. इ-सकाळच्या वेबसाईटचे रूपडेही बदलले आहे. तर
प्रहारनेही आपल्या वेबसाईटच्या रंगरंगोटीत बदल केला आहे. संद्याकाळ ने
काही महिन्यापूर्वी आपल्या किमतीत वाढ केल्याने त्यांचा 'पीओ' (printing
order) चांगलाच आपटलाय. पदवीधर मतदार संघात आमदारकीचे स्वप्ने पाहणाऱ्या
'बाईं' च्या हेकेखोरपणामुळे संद्याकाळची 'रात्र' होत चालली आहे. व्हिजन वार्ता दैनिकाची वाटचाल धुमधडाक्यात सुरु आहे. सध्या तरी एवढेच ...
नारायण ... नारायण ... ! आम्ही पुन्हा येतोय...वाट पहा...