महाराष्ट्राच्या मानबिंदूत 'दिलासा' कोणाला ?

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये  ब्युरो ऑफीसमध्ये जशी अस्वस्थता पसरली आहे, तशीच आता ग्रामीण भागातील वार्ताहरांमध्येही पसरली आहे.अनेक वर्षे महाराष्ट्राच्या मानबिंदूसाठी तुटपुंज्या मानधनावर ज्यांनी खस्ता खाल्ला त्यांना आता  निर्जीवमुळे हिवाळ्यातही उन्हाळा लागण्याची पाळी आली आहे.
या निर्जीवची पुर्वी दोन साप्ताहिके होती,ती बंद करून निर्जीव महाराष्ट्राच्या मानबिंदूत आले. आल्या - आल्या त्यांनी एका पुलाच्या बातमीवर स्वत:चे नाव कोरले. ( गंमत अशी की, पुलाची ही बातमी भोपाळशेठच्या पेपरमध्ये ऑलरेडी प्रसिध्द होवून बरेच दिवस झाले होते.फक्त शिळ्या कढीला ऊत देण्याचे काम निर्जीवनी केले. ) ज्यांनी वार्ताहरांचा गाडा हाकायचा,त्यांनी स्वत:च गाडा हाकण्यास सुरूवात केल्यामुळे  म्हणजे स्वत:च्या नावे बायनेम बातम्या सुरू झाल्यामुळे ब्युरो ऑफीसमध्ये चलबिचल सुरू झाली.नंतर निर्जीवनी काही जणांचे बिट चेंज केले,त्यामुळे आणखीच रोष वाढला.काही दिवसांपुर्वी निर्जीवंनी प्रतिस्पर्धी दैनिकांतील माणसे फोडण्याचा प्रयत्न केला,त्यामुळे अधिकच अस्वस्थता निर्माण झाली.
एकीकडे ब्युरोमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असताना, ग्रामीण भागातही तीच बोंब उठली आहे. निर्जीवनी काल औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील ग्रामीण वार्ताहरांची बैठक बोलाविली होती.त्यांनी फर्माण सोडले की, आता मरगळ सहन केली जाणार नाही.जे वार्ताहर कुचकामी ठरतील,त्यांना कामावरून काढले जाईल.निर्जीवनी असेही सांगितले की, पाणलोट क्षेत्राच्या जास्तीत जास्त बातम्या द्या.
यामागचे इंगित बिचा-या वार्ताहरांना काय माहित ?  निर्जीवची दोन साप्ताहिके बंद पडली आहेत, त्यातील बरेचशे वार्ताहर बेकार झाले आहेत,त्यांची महाराष्ट्राच्या मानबिंदूत वर्णी लागण्यासाठी निर्जीव उताविळ झाले आहेत. राहिला प्रश्न पाणलोट क्षेत्राच्या बातमीचा...निर्जीवची दिलासा नावाची मोठी एनजीओ संस्था आहे.या संस्थेला जास्तीत जास्त शासकीय कामे मिळावीत,यासाठी निर्जीव महाराष्ट्राच्या मानबिंदूचा पुरेपूर वापर करीत आहेत.
भोपाळशेठच्या पेपरला टक्कर देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मानबिंदूला दिलासा मिळण्यासाठी बाबूजींनी निर्जीवची निवड केली.मात्र या निर्जीवनी स्वत:च्या दिलासा संस्थेसाठी महाराष्ट्राच्या मानबिंदूचा वापर सुरू केल्यामुळे कोणाला, कोणाचा दिलासा मिळाला,याचे उत्तर सहज आणि सोपे आहे.
दुसरी गंभीर बाब अशी की, या संस्थेने मागे काही बोगस बिले उचलली असल्याची बोंब औरंगाबादच्या मीडियात उठली आहे. जळगावला बड्या धेंड्यांच्या मुसक्या आवळून औरंगाबादेत दाखल झालेल्या एका पोलीस अधिका-यांकडे हे प्रकरण सध्या चौकशीसाठी दाखल झाले आहे.त्यात निर्जीव प्रचंड अडचणीत येण्याची शक्तता वर्तविण्यात येत आहे.

जाता - जाता : दिलासाचे चौकशी प्रकरण ज्यां पोलीस अधिकाऱ्यांकडे आहे, ते पुर्वी जळगावला होते.त्यांनी जळगावला असताना,घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांच्या मुसक्या आवळून जेलमध्ये टाकण्याची हिंमत दाखविली होती. हे पोलीस अधिकारी एका माजी सचिवांचे जावाई असून, कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडत नाहीत. सुरेश जैन हे महाराष्ट्राच्या मानबिंदूवाल्यांचे पाहुणे...त्यामुळे महाराष्ट्राच्या मानबिंदूने जळगावात या पोलीस अधिकाऱ्याच्या बदनामीची मोहीम उघडली होती. या पोलीस अधिकाऱ्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जळगावला कार्यरत असताना त्यांनाही महाराष्ट्राच्या मानबिंदूने त्रास दिला होता.सांगायचा मुद्दा म्हणजे, या पोलीस अधिकाऱ्याचे आणि महाराष्ट्राच्या मानबिंदूचा छत्तीसचा आकडा आहे. निर्जीवच्या दुर्देवाने दिलासाचे प्रकरण या पोलीस अधिकाऱ्याकडे आहे.निर्जीव स्मार्ट मित्रमध्ये असते तर त्यांना थोडासा दिलासा मिळाला असता,मात्र आता निर्जीवच्या बाबतीत (सिंघम मधील डॉयलॉग) आली रे आली, आता तुझी पाळी आली म्हणण्याची वेळ आली आहे.

ता.क. निर्जीवनी या पोलीस अधिकाऱ्यास महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये कॉफी टेबलसाठी बोलावून मोठी स्तुती केली होती.मात्र नंतर या पोलीस अधिकाऱ्याला कळले की, निर्जीव कशासाठी ऐवढी मोठी स्तुती करीत आहेत.