नारदाची भ्रमंती...

लोकसत्ताचे संपादक तथा कॉर्पोरेट पत्रकार गिरीश कुबेर यांनी मागील आठवड्यात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनी ' पत्रकार हे इतर नागरिकापेक्षा विशेष मानून त्यांच्यावरील हल्ल्याविरुद्ध विशेष संरक्षण  देण्याचा आग्रह का धरावा ?' असे विधान करून महाराष्ट्रातील तमाम ( मोजके सोडून ) पत्रकारांची निराशा अंगावर ओढून घेतली . एकीकडे पत्रकार हल्ला विरोधी कायदा पारित करण्यासाठी पत्रकारांनी एकीची वज्रमुठ एकवटली असताना दुसरीकडे कुबेरानी या प्रकरणात वादग्रस्त उडी घेतल्याने पत्रकार मंडळीतून निषेधाचे सूर एकवटले जात आहे. पत्रकार हल्ला कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुखांनी कुबेरांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.
 दैनिक ऐक्य चे कार्यकारी संपादक वासुदेव कुलकर्णीना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे . नुकतेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. ते पुन्हा ठणठणीत बरे होऊन त्यांना उदंड आयुष लाभूदे हि नारदाची इश्वरचरणी प्रार्थना.
तिकडे मुंबईत महाराष्ट्र टाइम्सच्या ' कार्निवल ' ची धूमधड्याकात सुरुवात झाली होती . मटाचा  कार्निवल फ्लोरला  मुंबईच्या महाविद्यालयीन तरुणायीची चांगलीच झुंबड अनुभवायला मिळाली. यावरून मुंबईतल्या मराठी वर्तमानपत्रात 'मटा' तरुणायीच्या गळ्यातले तायित बनले आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. तसेच 'मटा' मध्ये ' मटा वृत्तसेवा ' च्या नावाखाली काम करणाऱ्या अनेक पत्रकांना राबराब राबुनही अजून पगार वाढ मात्र झालेली नाही. इतर वर्तमानपत्रांपेक्षा लोकमत, सामना मध्ये पगाराची ' रेंज ' त्या मानाने बरी आहे. 
मुंबई पुढारीत कर्मचार्याची कमतरता अद्याप आहे . गिरधारींच्या  पाठोपाठ लोकमत मधून येणारे ' हौश्या - गवश्या ' नी  पुढारीत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारामुळे लोकमतमध्ये राहणे पसंत केले. नागपूर हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. अधिवेशनकाळात पत्रकारांच्या रोज रात्री आमदारांसोबत चांगल्याच ' मैफिली' रंगत होत्या; त्यामुळे दिवसभर कामाचा क्षीण काहीका होईना थंडावत होता. तर मुंबईहून आलेल्या पत्रकार मंडळीनी नागपुरातील प्रसिद्ध ' संत्राबर्फी '  खरेदी करायला मात्र विसरले नाहीत. नवाकाळ - संद्याकाळ दैनिकांचे लवकरच पुण्यात कार्यालय सुरु होणार आहे . त्याचा विस्तृत तपशील नारद लवकरच आपणास  देईल. 
सकाळने मागील पंधरवड्यात ' इ -सकाळ ' वेबसाईट रुपडे बदलले होते . नारदाने मागच्या भ्रमंतीत हे वृत्त दिले होते . नव्या वेबसाईटमध्ये अतीच रंगसंगती होती . तर एखाद्या बातमीला प्रतिक्रिया द्याची ठरल्यास तेथील रकान्यात (फोनेटिक / इंग्रजी किबोर्ड ने मराठी टायीपिंग ) केल्यास शब्दरचना जुळत नसल्याने या वेबसाईटचा ' हिट' चा ग्राफ कोसळला. परिणामी नवी वेबसाईट सकाळला पचनी न पडल्याने जुनाच ले - ओउट घेऊन वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली. 
 झी २४ तासचे बुलेटीन प्रोडूसर संतोष मोरे पाठोपाठ आणखी एका प्रोडुसर झी २४ तासला रामराम करणार आहे . व्हिजन वार्ताची सातारा आवृत्ती तुफान गाजतेय. मराठी वर्तमानपत्रसृष्टीत व्यंग चित्रांची जादू कमी झालेली दिसतेय.  दर्जेदार व्यंगचित्रांना वृत्तपत्रांकडून योग्य असा न्याय दिला जात नसल्याची अनेक व्यंगचित्रकारांची ओरड आहे . जय महाराष्ट्र न्यूज चॅनल २६ जानेवारीच्या मुहूर्तावर सुरु होणार असल्याचे ऐकिवात आहे. मात्र येत्या २०१३ वर्षात मराठी न्यूज चॅनलमध्ये जबरदस्त स्पर्धा सुरु होणार आहे हे मात्र निश्चित !
नारायण ... नारायण ... ! आम्ही पुन्हा येतोय...वाट पहा...