व्हिजन वार्ताची नगर आवृत्ती लवकरच

नगर- व्हिजन वार्ताची नगर आवृत्ती लवकरच सुरू होत असून त्यांनी सावेडी रस्त्यावर लोकमत भवन शेजारीच कार्यालय घेतले आहे. दीपक मेढे यांची वृत्त संपादकपदी नियुक्ती करण्यात आली असून इतरही टीम तयार आहे.
पुढारी, दिव्य मराठीच्या पाठोपाठ आता व्हीजनचे नगरमध्ये आगमन होत आहे. म. टा. येणार याची नुसतीच चर्चा राहिली, त्या आधी व्हिजनचे आगमन होत आहे. त्यामुळे नव्या पेपरच्या शोधात असलेल्या अनेकांची सोय होत असून व्हिजनमध्ये जाण्यासाठीसुद्धा अनेक जण इच्छुक असल्याचे समजते.