फोडाफोडाच्या राजकारणामुळे 'लोकमत'च्या ब्युरोमध्ये प्रचंड अस्वस्थता

औरंगाबाद - प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांना खपाचा फटका बसण्यासाठी त्यांचे कर्मचारी फोडण्याचे राजकारण  उन्हाळे - मुळे जोडीने सुरू केले आहे. मात्र त्यामुळे लोकमतच्या  ब्युरोमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

लोकमतच्या ब्युरो कार्यालयात नव्या वर्षात म्हणजे जानेवारी १३ मध्ये नविन सहा रिपोर्टरची भरती होणार आहे.या भरतीसाठी कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे आणि सरव्यवस्थापक बालाजी मुळे उर्फ एम.बालाजी यांनी प्रतिस्पर्धी दैनिकांना शह देण्यासाठी,पर्यायाने त्यांना खपाचा फटका बसण्यासाठी त्यांचे कर्मचारी फोडण्याचे काम सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांनी काहींच्या बाहेर मुलाखतीही घेतल्या आहेत.त्यात सकाळचा जयंत महाजन गटाचा एक मुख्य रिपोर्टर, सकाळ व्हाया पुढारीतून लोकपत्रमध्ये असलेला एक मुख्य उपसंपादक, सामनातून दिव्य मराठीत गेलेला एक रिपोर्टर, पुण्यनगरीत सध्या आत्मसन्मान गमावलेला एक वृत्तसंपादक यांचा समावेश आहे. या सर्वांना लोकमतने स्वत:हून बोलाविल्यामुळे त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. या सर्वांनी ४० ते ५० हजार पगार मागितला आहे, हे विशेष.
एवढा पगार देवून त्यांना घ्यायचे का, याबाबत उन्हाळे व मुळे संभ्रमावस्थेत आहेत.कारण ब्युरो कार्यालयातील जुन्या रिपोर्टरंमधील  एकालाही एवढा पगार नाही.नविन आलेल्या रिपोर्टंरना गलेलठ्ठ पगार आणि जुन्यांवर मात्र अन्याय,हे सुत्र बसत नसल्यामुळे ब्युरो कार्यालयात प्रचंड अस्वस्थता आहे.दरम्यान,ज्यांच्या मुलाखती झाल्या त्यांना लवकरच कळवू म्हणून निरोप देण्यात आला आहे.

जाता - जाता : कोणत्या दैनिकातील कोणत्या रिपोर्टरला लोकमतने ऑफर दिली आहे, त्यांची डिमांड काय आहे, कुठे मुलाखती झाल्या, याची सर्व बारीक - सारीक माहिती बेरक्याकडे उपलब्ध आहे.मात्र या कर्मचा-यांच्या भवितव्याचा विचार करून नावे प्रसिध्द करण्यात आली नाहीत.