दिव्य मराठीचा तोतया पत्रकार अटकेत

उस्मानाबाद - दिव्य मराठीचा पत्रकार असल्याचे सांगून लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या रामकिसन जाजू ( रा.कळंब )यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. दिव्य मराठीच्या टीमने जाजू यांच्या ब्लॅकमेल प्रकाराचा पर्दाफाश केला.
दिव्य मराठीच्या उस्मानाबाद पानावर यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. या बातमीत म्हटले आहे की, कळंबचे व्यापारी रामकिसन जाजू हे दिव्य मराठीचा पत्रकार असल्याचे सांगत होते.त्यांनी येथील सार्वजनिक न्यास कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देवून,अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत होते.अधिकाऱ्यांनी जेव्हा दिव्य मराठीच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधला तेव्हा जिल्हा प्रतिनिधी चंद्रसेन देशमुख यांच्यासह काहीजण पोहचले असता,जाजू यांची बोबडी वळाली.नंतर देशमुख यांच्या तक्रारीवरून जाजू यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच जाजू यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.

दै.दिव्य मराठी