महाराष्ट्रात दर पाच दिवसाला एका पत्रकारावर हल्ला ...

गेल्या तीन वर्षाची आकडेवारी बघितली  तरी महाराष्ट्रात  पत्रकारिता करणे किती कठीण झाले आहे   याचा अंदाज येऊ शकेल. 1 ऑगस्ट 2009 नंतरच्या  अकराशे दिवसात  राज्यात 234 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.2012 चाच विचार करायचा तर गेल्या अकरा महिन्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 61 पत्रकारांवर किंवा वृत्तपत्र कचेऱ्यांवर  हल्ले केले गेले आहेत.पुरोगामीत्वाचा वारसा सांगणाऱ्या आणि विचार,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणाऱ्या सभ्य आणि सुसस्कृत महाराष्ट्रात दर पाच दिवसाला एका पत्रकाराला झोडपण्यात येते. केवळ मारहाणच होते असं नाही तर पत्रकाराला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला जातो.

पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी 12 डिसेंबरपासून मी, किरण नाईक आणि आठ पत्रकार  नागपूर येथे आमरण उपोषणाला बसत आहोत.उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून किमान 200 पत्रकारांनी तरी नागपूरला यायला हवं.12 तारखेला सकाळी 10 वाजता आपण साऱ्यांनी  उपोषण स्थळावर  हिसला्रग का्रलेज जवळ जमायचं आहे.

  

 पत्रकारांचे आमरण उपोषण कशासाठी ?

यासंदर्भात एस.एम.देशमुख यांचा लेख वाचा पत्रकार मित्रवर... 

http://www.patrakarmitra.com/