औरंगाबादेत पुन्हा जागरणची अफवा...

औरंगाबाद - दिव्य मराठीने औरंगाबादेत पाऊल ठेवताना, जाहिरातीचा मजेशीर फंडा वापरला होता. चौका - चौकात उभारण्यात आलेल्या डिजीटल बोर्डावर आता चालेल तुमची मर्जी...तुमची मर्जी जाणून घेण्यासाठी येत आहे... अशा आशयाचा मजकुर लिहिण्यात आला होता.नंतर काही दिवसांनंतर कळले होते की, ही भास्कर वृत्तपत्र समुहाच्या दिव्य मराठीची जाहिरात आहे.
सांगायचा मुद्दा असा की, सध्या औरंगाबादेत ठिकठिकाणी अपनी आवाज सुनी क्या ? अशा आशयाचा मजकुर असलेले डिटीजल बोर्ड झळकले आहेत. त्यावरून जागरणची चर्चा सुरू झाली आहे. एका ज्येष्ठ पत्रकारांने  Danik Jagran Comeing Soon in aurangabad and Phale had join असा एसएमएस काहींना पाठविल्यामुळे या अफवातंत्रात अधिक भर पडली आहे.या संदर्भात डॉ.अनिल फळे यांच्याशी संपर्क साधला असता, आपणास याविषयी काहीही माहित नसल्याचे सांगितले.
ही जाहिरात कशाची असू शकते, याचा मागोवा बेरक्याने घेतला असता,ही एका बिल्डरची जाहिरात असून, त्याचा मीडियाशी कसलाही संबंध नाही,असे खात्रीशिररित्या सांगण्यात आले.

जाता - जाता : जागरणने अजून कोठेही औरंगाबादेत कार्यालय घेतलेले नाही. मागे दोन - तीन वेळा जागरण टीमने औरंगाबादचा धावता दौरा केला होता. आता जागरणची ही अफवा लांडगा आला रे आला प्रमाणे ठरत आहे.