'सकाळ' नाशिक आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी श्रीमंत माने

पुणे - 'सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक श्रीमंत माने यांची पदोन्नतीवर "सकाळ'च्या नाशिक आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. माने गेली 20 वर्षे पत्रकारितेत आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीस दैनिक "लोकसत्ता'मधून प्रारंभ केला. "हिंदुस्थान टाइम्स'सह अन्य काही दैनिकांतही त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. जलसिंचन, पायाभूत सुविधा, राजकारण, कुपोषण, खार जमिनींचा प्रश्‍न हे माने यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत.

'सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून काम पाहत असताना "सातपुडा बचाव अभियान', आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांचे प्रश्‍न, पर्यावरणावरील कार्यशाळा, खानदेशातील पायाभूत सुविधा, बेटी बचाव अभियान असे उपक्रम त्यांनी "सकाळ'च्या माध्यमातून सक्रियपणे राबविले. त्यांना यापूर्वी पत्रकारितेसाठी वसंतराव नाईक कृषिमित्र, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता आदी पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाच्या जलसंधारण सल्लागार परिषदेचे ते सदस्यही आहेत.
साभार - दैनिक सकाळ