दैनिक
भास्कर समूहाचे राष्ट्रीय संपादक (नेशनल एडिटर) कल्पेश याज्ञनिक यांना
समूह संपादक (ग्रुप एडिटर) म्हणून बढती देण्यात आल्याची माहिती
'बेरक्या'कडे आली आहे. याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. श्रवण गर्ग
'नई दुनिया'मध्ये गेल्यापासून 'भास्कर'चे समूह संपादकपद रिक्त होते.
व्यवस्थापनाने आता याज्ञनिक यांनाच त्या पदी नियुक्त करण्याचे नक्की केले
आहे. याज्ञनिक ज्या मेहनतीने आणि जीव तोडून काम करीत आहेत, त्याचेच हे फळ
मानले जात आहे. दुसरीकडे, उत्तर भारत प्रमुख म्हणून पंजाब, हरियाणा,
हिमाचल प्रदेशातील जबाबदारी सांभाळीत असलेले कमलेश सिंह यांनाही बढती
देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यांना गेल्या आठवड्यातच भोपाळमध्ये
बोलावून घेतले गेले होते. याज्ञनिक यांच्या बढतीमुळे रिक्त होत असलेल्या
जागी राष्ट्रीय संपादक म्हणून सिंह यांची वर्णी लागेल.