
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण सोमवारी खांडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते म्हणाले की, मराठीतील पत्रकारांनी बहुविध कौशल्ये आत्मसात करून स्वत:चा आवाका वाढवल्याशिवाय आजच्या पत्रकारितेत त्यांचा टिकावच लागणार नाही,
स्थलांतरास तसेच इतर भाषेत पत्रकारिता करण्यास मराठी पत्रकार नाखुश असतात. मराठी पत्रकारांनी स्वत:भोवती उभ्या केलेल्या संकुचित भिंती भविष्यात त्यांच्या नोकºया संपुष्टात आणू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, कार्यवाह विजयकुमार बांदल आणि संयुक्त कार्यवाह प्रभाकर राणे होते.
या कार्यक्रमात संध्या नरे-पवार (चित्रलेखा), योगेश त्रिवेदी (सामना), मुकुंद संगोराम (लोकसत्ता) आणि रमेश औताडे (पुण्यनगरी) या पत्रकारांना खांडेकर यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल पुरस्कार देण्यात आले.