मुक्काम पोस्ट मुंबई...

हा बेरक्याचा अधिकृत लोगो आहे,अन्य पत्रकारांस वापरण्यास बंदी आहे...
मुंबई मंत्रालय वार्ताहर संघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र थोरात यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी मनीषा रेगे निवडून आल्या. संघाच्या कार्यवाहपदी मंदार पारकर, कोषाध्यक्षपदी महेश पवार, तर कार्यकारिणी सदस्यपदी खंडूराज गायकवाड , पुरूषोत्तम आवारे पाटील , विनोद यादव , राजू झनाके आणि श्यामसुंदर सोन्नर निवडून आले . निवडणुकापुरते एकमेकांच्या विरोधात ठाकलेले पत्रकार उमेदवार निवडणुकीच्या निकालानंतर क्यानटीन मध्ये एकत्र बसून चहाचे घोट घेतानाहि दिसले, आणि खर्याअर्थाने वार्ताहर संघाच्या निवडणुकांचे वादळ शमल्याचे अधोरेखित झाले .
  महाराष्ट्र टाइम्सने मुंबईतील आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे. तर सर्व आवृत्यानी नवे ९४ हजार नवे वाचक जोडले आहेत . इंटरनेट , टीव्ही आणि मोबाईलच्या  वाढत्या काळातही सतत नवनवीन उपक्रम राबून , वाचकांशी संवाद प्रस्तापित केलेल्या महाराष्ट्र टाइम्सने मुंबईसह नाशिक , पुणे , औरंगाबाद , नागपूर आणि कोल्हापुरात आवृत्या सुरु करून आगेकूच केली आहे . नुकत्याच जाहीर झालेल्या ' आय आय एस २०१२' च्या ' क्यू -३ ' नुसार महाराष्ट्र टाइम्सच्या सर्व आवृत्त्यानी एकूण वाचक संखेत ९४ नव्या वाचकांची भर पडली आहे. तर ' मटा ' ने मुंबईतील प्रथम स्थान कायम ठेवले आहे 
 नवाकाळमधून हकालपट्टी केलेले राहुल लोंढे  धारप यांच्या ठाण्यातून प्रसिद्ध होणार्या दैनिक विश्वरूपच्या तंबूत आले होते. त्यांच्या कारनाम्यामुळे त्यांना तिथूनही ' नारळ ' देण्यात आला आहे.  बेळगाव तरुण भारतचे आता लवकरच दर्जेदार मासिक वाचकांना पहायला मिळणार आहे. लोकमतमध्ये विनायक पात्रुटकर यांनी नवी धडाकेबाज इनिंग सुरु केली आहे. सहकार्यासोबत रममाण होत उत्तम वृत्तसंपादनाला वक्तशीरपणाची जोड देत अनेक नवनवीन विषयाची सांगड घालायला सुरवात केली आहे. 
 टीव्ही ९ ने महाराष्टाशी  चांगलीच  जोडली आहे . लोकांच्या थेट भावनिक मुद्द्यात हात घालून एक ' कॉमन म्यान ' प्रेक्षक वर्ग आपलासा केला आहे . गाजलेली ' शाखा ९ ' ची टीम सध्या बीड , जालनासह अनेक दुशाकी भागात तळ  ठोकून बसली आहे. तेथिल शेतकऱ्यांची प्रश्न , पिण्याच्या पाण्याचे , चारा टंचाई, जनावरांचे प्रश्न चांगलेच लाऊन धरले आहेत. फक्त नारदाला खटकतो तो ' प्रमो ' ज्यात बाईनी पेपर स्टोलवर जाऊन  म्हटलंय कि , '' आता तुमच्याकडे पेपर आला नाही तरी चालेल ....'' तोच तो ! यावरून ' त्यांची ' वर्तमानपत्रा विषयीची असंवेदनशीलता स्पष्ट होते. आणि ' आम्ही केलं .. तमुक केले ' अशी शेखी मिरवली जाते . ठीक आहे तुम्हीच केलं ... पण मायबाप प्रेक्षकामुळेच ना ? त्यांना पण द्या कि थोडीफार क्रेडीट.. असो ! मागे ' फर्स्ट पोस्ट ' या इंग्रजी वेब पोर्टलने वर्तमानपत्राच्या कागदासाठी कशी जंगलतोड होते आणि निसर्ग कसा लोप पावतो याचा जावईशोध  त्यांच्याच एका जाहिरातीतून लावला होता. मुंबईत सध्या टाइम्स ऑफ इंडिया , मिड -डे , डीएनए , मुंबई मिरर , हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी दैनिकांचे सेल्स आणि मार्केटिंग विभाग चांगलेच कामाला लागले आहेत . या बहुतांशी दैनिकांचे वार्षिक वर्गणीदार वाचकांच्या तारखा संपल्या आहेत, त्यामुळे पुन्हा वाचकवर्ग गोळा करण्यासाठी फोनाफोनी , चेक जमविण्यात मग्न आहेत . प्रिंट, इलेक्ट्रोनिक मिडिया सोबत आता वेब मीडियात कमालीची वाढ होत आहे . इंटरनेट , आयफोन , ट्याबलेट्सच्या जमान्यात वाचकवर्गाला सतत अपडेट ठेवणारी वेबपत्रकारिता यंदाच्या वर्षी चांगलीच गाजण्याची समीकरणे दिसत आहेत. तर अनेक वर्तमानपत्रे आपले स्वताचे ' अप्लिकेशन ' बनवण्यात विचाराधीन असल्याचे नारदाला पुसटशी कल्पना आहे. 
 हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर ' सामना ' तून लेख अथवा मतांविषयी मिडिया दखल घेते कि नाही याकडे राजकीय नेत्यांची नजर खिळली होती मात्र नुकत्याच उद्धव ठाकरेंच्या सामनातून प्रसिद्ध झालेल्या म्यारेथोन मुलाखतींची राष्ट्रीय पातळीवरिल मिडीयाने दाखल घेतली आहे . तर सामन्याच्या प्रेस लाईनवर उद्धव ठाकरेंचे नाव आता संपादक पदी लागले आहे.  व्हिजन वार्ताची नगर आवृत्ती सुरु झाली आहे . तर ' जय महाराष्ट्र ' च्यानेलचे स्वरूप कसे असणार यावर मीडियातील अनेकांचे लक्ष लागून आहे . हिंदीत एक राष्ट्रीय वृत्तवाहिनी सुरु होणार आहे . त्याची माहिती मिळताच लवकरच आपणास दिली जाईलच ! तर कल्याण - डोंबिवलीच्या पालिका पत्रकार कक्षात  कमालीची शांतता असते ती संद्याकाळी प्रेसरूम बंद झाल्यावर आणि सकाळी उघडायच्या आत . ' शिस्तप्रिय ' आणि ' बंधूभावाच्या'  प्रेमाचे ' बंध ' येथे चांगलेच दिसून येत आहे . तिकडे वसईत ' मटा ' चे ' स्टार पत्रकार ' मयुरेश वाघावर  एका 'लोहारा' ने चांगलीच घाव घातली आहे. विरारच्या रहिवासी सुनिता लोहार यांच्या कुटुंबियांना  दमदाटी , मारहाण करणाऱ्या आरोपींना मयुरेश वाघ बगल देत उलट लोहार कुटुंबियांना दमदाटी केल्याचा वाघ यांच्यावर ठपका ठेवला आहे. त्या प्रकरणी त्यांनी ' वाघा ' विरुद्ध थेट महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार केली आहे. आता पानवलकर ' वाघा ' विषयी काय निर्णय घेतायेत याकडे लक्ष लागून आहे.