मुंबई खबरनामा : 'स' संकटाचा - राजकारणी संपादक आणि संपादक राजकारणी दोन्हीही अस्वस्थ


आमचे बरेच चाहते नेहमी मागणी करतात की, राजधानीतील काहीतरी द्या. मात्र, आम्ही पडलो छोटी माणसे, लहान तोंडी मोठा घास कसा घेणारा? आणि आपण सारे जाणतातच की बेरक्या कुणी एक नाही; आपण सारे बेरक्या आहात. चांगल्या-वाईटावर नजर ठेवून आहात. अशाच आमच्या एका मुंबईतील बेराक्याची ही पोस्ट... आम्ही खात्री करून घेतलेली; १०० टक्के सत्य! 
सध्या महाराष्ट्राच्या पत्रकारितेत 'स'वाले संपादक संकटात आहेत, अस्वस्थ आहेत. कदाचित शीर्षक वाचून आपणही अस्वथ झाला असाल, की काय ही भानगड?  कोडी कसली घालताहेत, थेट मुद्द्याला हात घाला ना. मध्यंतरी अस्सल खानदेशी भरीताची चव चाखायला एका जिल्हा पत्रकार संघात पत्रकारदिनाच्या कार्यक्रमाचे निमित्त साधून दोन बडे मुंबईकर वक्ते आले होते. दोघांचाही संबंध 'महाराष्ट्र'शी! व्हाया 'एक्स्प्रेस टॉवर' सध्या बोरीबंदल्या 'पत्र नव्हे मित्र'मध्ये दर गुरुवारी राजकीय 'ट्रिक्स' करणारा एक संपादक ज्याचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेत 'राजकारणी संपादक' असा केला गेला होता. दुसरे होते योगगुरू रामदेवबाबांनी मुंबईतील ज्या बारमध्ये कार्यक्रम केला होता, ज्या बारमध्ये एक कोट्यधीश बारबाला आपल्या 'तरन्नुमी' अदा पेश करून क्रिकेटर्सनाही घायाळ करायची, त्या बारच्या मालकांच्या नव्या मराठी वृत्तवाहिनीतील संपादक. दोघांनी जबरदस्त भाषणे केली हं. अगदी पुण्यात बडे आयकर अधिकारी असलेल्या खानदेशी आयकॉन 'संदीप' साळुंखेसारखेच तुफानी बोलले दोघे 'प्रधान' वक्ते. खान्देशात असे तुफान बोलतात ते फक्त सध्या नाशिकला बदलीवर गेलेले 'भोईटे'गढीवर राहणारेच. 'तुलसी' आहे त्यांच्या अंगणात इवलीशी रोवलेली; त्यांचेही भाषण ऐकले की वाटते 'दास' व्हावे या माणसाचे! 
फार लांबयाला नको. आपण सध्या त्या दोघा खानदेशात आलेल्या पाहुण्यांपैकी पहिल्या 'ट्रिक्स'वाल्यांचे बोलूयात. कारण गेल्या गुरुवारी 'स्मार्ट मित्र'मध्ये 'ट्रिक्स' गायब झाली होती. या राजकारणी संपादकांना लक्ष्मणराव ढोबळे यांना नडणे महागात पडले. संपादकांनी आदेश दिले की यापुढे 'राजकीय युक्त्या' बंद; नाही लिहायचे ते!  कॉंग्रेसचे पार्ल्यातील आमदार व पत्रकारमित्र कृष्णा हेगडे यांनी तक्रार केल्याने हा फतवा निघाला. 'एक्स्प्रेस टॉवर'वाल्यांना काय माहितेय की बोरीबंदारातले राजकारणी किती बेरकी आहेत ते. त्यातील निम्मे तर 'प्रभादेवीतील शाळेतून' राजकारणाचे धडे गिरवून आले आहेत ते. कुणाला किती दिवस, कसे फडफडू द्यायचे आणि मग कुणाची खाट कशी, कधी, केव्हा आणि कुठे पाडायची ते प्रभादेवीतील शाळेत गेल्याशिवाय नाही कळायचे. 
आता पोहोचलोच आहोत आपण नागू सयाजी वाडीत तर तिथेच जरा डोकावून पाहूयात. अरे ही काय बातमी? म्हणे तिकडे कोकणात कुणीतरी म्हणे 'राऊत' यांना वैतागून बाहेर पडले. नाही का; आपाला संबंध नाही, ते विदर्भातले आहेत म्हणे! काय संभाषण चालते इथे प्रभादेवीत काही काळात नाही. पेपर कमी आणि राजकारणच जास्त. हे म्हणजे संपादकाच जणू राजकारणी म्हणायचे की! ते पहिले होते ते राजकारणी संपादक आणि हे संपादक राजकारणी!! त्या पाहिल्याप्रमाणेच हे दुसरे ... इथेही जाम अस्वस्थता आहे. 'स' संकटाचा इथेही आहे.कधी-कधी ना काय असते की चेला हा गुरूला भारी पडतो. इथे तसे झालेय. प्रभादेवीतील शाळेतून बोरीबंदरात पोहोचलेला जो चेला आहे ना तो इथल्या गुरूला सध्या संताजी-धनाजीसारखा सर्वत्र दिसायला लागलाय. वास्तविक दोघांच्याही राशी एकच, नाव एकच... पण कधीकधी ना काय होते की मुंगीही हत्तीला भारी पडते; त्यामुळे कधी कुणाला कमी लेखू नये, कुणाला हिणवू नये की कुणाची टर उडवू नये. 'संजय'ने ही युद्धभूमीवर न जाता, प्रत्यक्ष लढाई न लढता तिथली लाईव्ह स्टोरी ऐकाविलीच होती की.
'संजय'कथा मध्येच आली ती अशासाठी की प्रत्येकाचे कोणत्याही 'महाभारता'त योगदान, स्थान असतेच, हे विसरू नये. आता हेच पाहा, आपण आहोत प्रभादेवीत; पण इथूनच बोरीबंदरात गेलेल्या शिष्याचे 'कलानगर'मध्ये जाम म्हणजे जामच भारी संबध आहेत. आमचे कार्यात मग्न प्रमुख कधी कुणाला सांगायचे नाहीत ती गुपिते या शिष्याला सांगतात, त्याचे सल्ले घेतात आणि कामेही झटकन करतात. लहान वयात जाम प्रगती केलीय या बहाद्दराने. मानावे लागेल ह. पुण्याच्या रानडे शाळेतील शिक्षणच असते तसे जबरदस्त! आम्ही तर राज्यातील प्रत्येकाला सांगू बाबा रे पत्रकारिता शिकायची असेल ना तर जा पुण्यात ... इकडे-तिकडे कुठेही 'पीआरओ' घडविणारया शाळांमध्ये नका जावू रे!  रानडेतील शिक्षण 'व्हन'डरफुलच हं, कुणी 'माने' या ना माने! तर असा हा अवलिया शिष्य आणि त्याचे जाम भारी संबंध गुरूला नाही म्हटले तरी थोडेसे अस्वस्थ करणारच ना. पण या शिष्याने कधी गुरूला टांग नाही मारली कधी. अगदी प्रामाणिक, १०० टक्के निष्ठावान. त्याची कलानगरात सलगी वाढली हे त्याचे स्कील... त्याचा काय दोष त्यात. पण नाही... गुरूला घेरलेल्या चौकडीने कान भरले... गुरू अगदी भलतेसलते बोलून गेले शिष्याला... नको, नको ते बोलले.. शिष्य प्रामाणिक तरीही हे असले फळ म्हणून चिडलाय. त्यामुळे आता हा शिष्य चुकून कलानगरात काही करून आला तर आपली खाट पडू शकते, या जाणीवेने गुरू अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आयुष्यभर अनेकांच्या खाटा पाडल्या. अनेक चांगली माणसे चांडाळ चौकडीच्या सल्ल्यावर हकनाक गमावली. 
अहो या गुरूसाठी अख्खे आयुष्य ज्याने पणाला लावून दिले त्या आपल्याच राशीतील इमानदार, निष्टावंत्याच्या नावाचा मुळीक सॉरी मुळीच विसर पडायला नको होता. पण पडला विसर, नाही झाला 'दृष्टांत'! कानामागून आले आणि तिखट झाली अशा चौकडीतील बोलक्या बाहुल्यांची नावे आली; पण हा बिचारा नाही आठवला. युगान्त हो युगान्त आहे ... निष्ठा पदरी वाहिल्या आयुष्यभर त्याचे हेची काय फळ! बिचारा एका शब्दावर टॉवर सोडून प्रभादेवीत धावत आला... शाखाप्रमुख होता हा निष्ठावंत शिवसैनिक ... पक्षात राहिला असता तर कुठल्या कुठे गेला असता... बोन्साय केला बिचारयाचा पार बोन्साय... आणि आता साध्या नावाचा उल्लेखही नाही!! तो करेल सहन, कोकणातला गडी आहे ... पण सावंतवाडी ओलांडून पलीकडे घाटावरून पश्चिम महाराष्ट्रात गेले की कोण कशाला सहन करेल? स्वाभिमान दुखावला, वाट्टेल ते बोलले तर कुणीही चिडणारच ना! तसा हा बोरीबंदरातला शिष्य चिडलाय. ती जाणीव झाल्याने प्रभादेवीतील संपादक राजकारणी अस्वस्थ आहेत. त्यांनी मुंबईतील गुन्हेगारी पुस्तकबद्द करणारया आपल्या गुन्हेवार्ताहरामार्फत बोरीबंदरी शिष्याला निरोपही धाडला भेटायला येण्याचा; पण शिष्य काही आता मानायला तयार नाही. कसे मानणार, मनातल्या भावना ज्या काही आहेत त्या आपण टर उडवीत बोलून तर गेलात ना! आता आपल्या फायद्यासाठी माफीनामा जरी सादर केला तरी एकदा बोलून गेलेले शब्द कसे परत घेणार? 
राजकारणी संपादक आणि संपादक राजकारण्यानंतर आता वळूयात खानदेशी भरीत खायला आलेल्या दुसरया संपादकाच्या वाहिनीकडे ... बहुधा महाराष्ट्रदिनी म्हणे ही वाहिनी सुरू होईल. या वाहिनीचा मालक म्हणजे आमच्या कोकणच्या एकमेव लोकानेत्याचा एकदम खास! त्याने चक्क योगगुरू रामदेवबाबा यांना 'बार'मध्ये बोलावण्याची किमया साधली होती. काय बारबाला होती एकेक कोट्यधीश! काय त्यांच्या अदा तरन्नुमी! हा मालक म्हणजे बेटिंग धंद्यातील बापमाणूस, किंग! आमचे हृदयसम्राट यांचे निधन झाले त्यावेळी हे मालक अखेरचा  'जय महाराष्ट्र' करायलाही नव्हते. कोकणच्या नेत्यांबरोबर परदेशात फिरायला गेले होते. तर इतकी ही घट्ट दोस्ती! अशी गट्टी जणू एखादा शेट्टी ... तोही साधासुधा नव्हे महाराष्ट्रसुधाकर पुन्हा सॉरी सुधाकर नव्हे सुधारक ... महाराष्ट्रसुधारक. तर या वाहिनीत संपादकांची गर्दी झाल्याने आता राजकारण सुरू झालेय... सारी दिग्गज माणसे जमली की असेच इंडिया फॉर भारत होणार! पूर्वीचे जे सर्वेसर्वा होते ते आता नवी माणसे येत असल्याने जाम नाराज झाले आहेत. कोल्ह्याला द्राक्षे आंबेट... काय करणार. काय एकेक म्हणी आपल्या द्राक्षेच का हो आंबट, फणसे का नाही घेतली या म्हणीत.  अहो आता त्याचमुळे तर लोचा झालाय ना! त्यांचाच घेतले तर अनेकांना ते नकोहेत. म्हणे ते डोक्यावर बसविलेहेत आता त्यामुळे आणखीनच आंबेटपणा वाढलाय. आता म्हणे जग जिंकायला निघालेल्या पण 'महानगरी' दाढीवाल्या बाबाने ढुंगणावर लाथ मारून हाकललेल्यांचेच पुनर्वसन होणार... 
बरे रामदेवबाबांचे ४०००-५००० कोटी रुपये वरच्यावर फिरवीत असलेल्या कोकणी नेत्याचा मित्र असलेला मालक आता नवी मंडळी आल्याने जुन्यांची मंदारधरणी (शी! पुन्हा चूक... कृपया शुद्धलेखन समजून घ्यावे ... मनधरणी असे वाचावे) करायला तयार नाही. बरे जे नवे आलेहेत ते अनेक अटी घालून... भारतासाठीचा भारत सुरूच ठेवेन, ही मुख्य अट आहे. त्यांच्याव्यतिरिक्त आऊटपुट वाढावे म्हणून काही एडिटर आले आहेत. हे पूर्वी एक पाउल पुढे  होते... तिथून जनसामान्यांची महाशक्ती बनले. पुन्हा काय वाटले तर वर्तमानात आवडत नाही म्हणून भविष्यपत्राचा उदय कसा होतोय ते पाहायला गेले. तिथूनही पुन्हा दुसरया एका उदयकडेच प्रचंड खपाच्या एकमेव नि:पक्ष व निर्भीड दैनिककडे गेले. एकूणच इथे असे दिग्गज आता जमा होताहेत की बातम्यांचा योग मस्त जुळून येणार...