वॉशिंग्टन-
वृत्तपत्रातून ‘विकणे आहे’ असा जाहिरात कॉलम नेहमी पाहण्यात येतो. परंतु
वृत्तपत्रालाच विकण्याची वेळ अमेरिकेतील दबदबा असणार्या आणि बड्या
दैनिकांवर आली आहे. ‘द बोस्टन ग्लोब’ दैनिकाला बाजारात विक्रीसाठी
आणण्यासाठी अभ्यास सुरू झाला आहे. देशातील इतरही अनेक दैनिकांची मालकी
बदलणार आहे. द बोस्टन ग्लोबला 1993 मध्ये न्यूयॉर्क टाईम्स कंपनीने विकत
घेतले होते. त्या वेळी टाइम्सने सुमारे 598 कोटी रुपयांना त्याची खरेदी
केली होती. आता ते केवळ 11 कोटी डॉलर्समध्ये विकले जाण्याची शक्यता आहे.
अनेक मुद्रित माध्यमांना अवकळा
प्रमुख कारणे
> वितरणाचा वाढता खर्च
> दैनिकांचा खप घसरला
> जाहिरातींचे प्रमाण घटले
दिवाळखोरी : अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तपत्रांना आर्थिक ताळेबंद
ठेवताना चांगल्याच अडचणी आल्याचे दिसून येते. बिझनेस मॉडेलची निर्मिती
करण्यात या वृत्तपत्रांना अपयश आल्यानेच दिवाळखोरी आल्याचे चित्र पाहायला
मिळत आहे.
एलए टाइम्स विक्रीला : ‘द लॉस एंजलिस टाइम्स ’, ‘शिकागो ट्रिब्युन
’, ‘बाल्टीमोर सन ’ या वृत्तपत्रांचीही विक्री होणार आहे. याशिवाय
ट्रिब्युन कॉर्पोरेशनच्या मालकीचे आणखी पाच प्रकाशनेही विक्रीच्या मार्गावर
आहेत.
छोट्या जाहिरातीमुळे गंडांतर : बहुतांश दैनिकांचे अर्थकारण गेल्या
काही वर्षांपासून छोट्या जाहिरातीवर अवलंबून होते. त्याचा वाईट परिणाम एकूण
उत्पन्नावर झाला. इतर क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याने उत्पन्न बुडाले, असे
माध्यमतज्ज्ञ अँलन मटर यांनी सांगितले.