नमस्कार मंडळी...
बेरक्या उर्फ नारद हा ब्लॉग सुरू करून, लवकरच दोन वर्षे पुर्ण होतील. २१ मार्च २०११ रोजी आम्ही हा ब्लॉग सुरू केला होता. आम्ही मुंबईहून अपडेट होत असलेल्या बातमीदार ब्लॉगचे मोठे चाहते होतो. मात्र बातमीदार ब्लॉग कालांतराने बंद पडला.आमचे मोठे बंधु बोरूबहाद्दर यांनीही लिखाण बंद केले.अशा परिस्थितीत आम्ही एकटे पडलो होतो.मात्र आपल्या पाठबळावर हे शिवधनुष्य अजूनही उचलून धरले आहे.
सुरूवातीस आम्ही काही लोकांवर विश्वास ठेवून आम्ही बातम्या दिल्या होत्या.त्यांनी आमचा वापर स्वार्थासाठी केला.मात्र ज्यावेळी ही गोष्ट आमच्या लक्षात आली,तेव्हा जे सत्य आहे, तेच देण्याचा प्रयत्न चालू आहे. काही वेळा बातम्या नसतात,त्यामुळे आठ - आठ दिवस ब्लॉग अपडेट होत नाही,मात्र याचा अर्थ ब्लॉग बंद पडला... असा होत नाही.मीडियातील प्रत्येक बातमीवर आमचे लक्ष आहे. कोणतीही बातमी दबली जाणार नाही किंवा दबणार नाही, हा बेरक्याचा शब्द आहे.
आम्ही हा ब्लॉग चालवित असताना कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही.एखादा संपादक किंवा पत्रकार कितीही मोठा असला तरी त्याची गय कधीच केली नाही.किंवा वृत्तपत्राचा मालक कितीही मोठा असला तरी त्याच्यापुढे झुकलो नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी आणि संरक्षणासाठी ही चळवळ आहे.
महाराष्ट्रातील तमाम बोरूबहाद्दरांना मोठा प्रश्न पडला आहे की, बेरक्या नेमका कोण आहे?
बेरक्या सर्वच ठिकाणी आहेत.आता आपण कोणाकोणाचे नाव घेणार? जे चांगले पत्रकार आहेत, ते सर्व बेरक्या आहेत.जे बदमाश आहेत, ते बेरक्याचे दुश्मन आहेत.बेरक्या हा कधीच चांगल्या पत्रकारांच्या विरोधात नाही आणि राहणार नाही.म्हणून आपणास विनंती आहे की, आपण बेरक्याला शत्रू नव्हे मित्र माना.त्याचा साक्षीदार बना.त्याला सहकार्य करा.
बेरक्याची ही चळवळ मीडियातील घाण साफ करण्यासाठी आहे. चांगल्या पत्रकारांना पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आहे.मीडियात सर्वच पत्रकार चांगलेही नाहीत आणि वाईटही नाहीत.
जे चांगले आहेत, ते आमच्या सोबत आहेत, जे वाईट आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही नक्कीच आहोत.मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास बेरक्या तयार आहे.बेरक्याकडे सर्व पॉवर आहे, मात्र ही पॉवर फक्त वाईटांचा नायनाट करण्यासाठी वापरली जाते.
बस्स सध्या तरी ऐवढेच.
बेरक्या ब्लॉगला दोन वर्षे पुर्ण होत असल्याबद्दल आपल्या काही सुचना जरूर कळवा.चांगल्या सुचनांचे आम्ही स्वागत करू.
पत्रकारांचा पाठीराखा...
बेरक्या उर्फ नारद