मुंबई - झी 24 तासचे आऊटपूट एडिटर अनंत सोनवणे यांना अखेर नारळ देण्यात आला आहे.
इतकंच नव्हे तर सोनवणे पुन्हा ऑफिसमध्ये येवू नयेत यासाठी सिक्युरिटीलाही
सूचना देण्यात आल्या. अनंत सोनवणे यांनी चेअरमन सुभाष चंद्र यांच्याकडे
तक्रार नोंदवली होती, मात्र उपयोग झाला नाही.
डॉ. उदय निरगुडकर यांच्या
जातीयवादाने अनंत सोनवणेंचा बळी घेतला. दिनेश पोतदार यालाही राजीनामा
द्यावा लागला. पुढील काही दिवसांत आठ ते दहा जणांचे राजीनामे घेतले जाणार
आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे एकाही ब्राह्मणाचा राजीनामा घेतला जात
नाही. बहुजनांचे बळी देण्याचं काम सुरू आहे.
इतके दिवस अनंत सोनवणेंच्या बरोबर असणा-या स्नेहा अंकईकर, कल्याणी
कुलकर्णी या ब्राह्मम कन्या आता ब्राह्मण गटात सामील झाल्या आहेत. अनंत
सोनवणेंना मानणारा गट आता जवळपास नामशेष झाला आहे. विठोबा सावंत हा अनंत
सोनवणेंचा समर्थक, मात्र त्याने निरगुडकर याच्याबरोबर जमवून घेतलं आहे. तर
मिळालेलं रिपोर्टिंग वाचावं यासाठी कृष्णात पाटीलनंही विठोबाच्या सुरात सुर
मिसळला आहे. त्यामुळे आता डॉ. उदय निरगुडकर याच्या विरोधात फक्त विनोद
पाटील एकटा लढत आहे. मात्र झी 24 तासमधल्या ब्राह्मण गटाला मोठा जोर आला
आहे. संदीप साखरे, अमोल परांजपे यांना आऊटपूट एडिटर आणि शिफ्ट इन्चार्ज
होण्याची स्वप्न पडू लागली आहे. झी 24 तासमधून पद्धतशीरपणे बहुजनांना
काढण्याचं काम सुरू आहे. मागील काही महिन्यात ब्राह्मणांची झालेली भरती आणि
बहुजनांची झालेली गच्छंती याचं जळजळीत उदाहरण आहे.