* 'गांवकरी'
लवकरच मुंबई आवृत्ती सुरू करणार; मंत्रालयासाठी व मुंबई/ठाणे/सानपाड्यात
नव्या माणसांचा शोध सुरू. सध्या इन-मीन-साडेतीन माणसांवर चालतोय कारभार.
-'गांवकरी'च्या
मालकांनी माणसे सांभाळण्याचे मवाळ धोरण सोडले. दीपक रत्नाकर यांचा
अल्टीमेटमनंतर 'पुण्यनगरी'त प्रवेश. तुळशीदास बैरागी यांचेही काम थांबविले.
कार्यकारी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या जवळकीतील अनेक माणसे सध्या
'रेड झोन'मध्ये. संतोष लोळगे यांची तनपुरेंशी जोरदार खडाजंगी. त्यानंतर
लोळगे हेही बाहेर.
* अलिबागेत अस्वस्थता... 'कृषीवल'मधून
अनेक माणसे पडली बाहेर. संजय आवटे एकाकी पडले;
* भालचंद्र
पिंपळवाडकर(९७६५५६६००९) यांचा 'पुढारी'ला रामराम! 'सकाळ'मध्ये प्रवेश;
श्रीराम पवार यांच्याशी असलेल्या कोल्हापूर कनेक्शनमुळे 'खानदेश सकाळ'च्या
निवासी संपादकपदी वर्णी लागण्याची शक्यता. मुकुंद एडके, चंद्रकांत यादव
यांची संधी हुकणार! विवेक गिरधारी यांना 'सानपाडा पुढारी'तील मूळपुरुष
पिंपळवाडकर यांची विकेट घेण्यात यश आल्याने त्यांची वट वाढणार ... अर्थात
माणसांचा त्रासही वाढणार. गणेश देवकर, संतोष खरात यांचाही छळाला कंटाळून
राजीनामा. गिरधारी देवकराला म्हणे, मला सॉरी म्हण. सॉरी म्हटले तरच काम करू
देईन. गिरधारी यांना पाहताच कटू पाहताहेत 'पुढारी'तील माणसे ...
* मंदीच्या
लाटेत 'दिव्य मराठी'तीतही अस्वस्थतेचे वारे. कार्पोरेट सोशल विभाग
तडकाफडकी बंद केला. अनेक जणांना नारळ. वेब आवृत्तीचे संपादक विश्वनाथ गरुड
यांचा राजीनामा. कामाचा अतिरिक्त ताण, फेव्हरीझम, संपादकांची मनमानी यामुळे
औरंगाबादेत अनेक जण हैराण.
* सकाळ व 'एग्रो वन'चे अकोला प्रतिनिधी गोपाळ हागे यांचा राजीनामा. 'आधुनिक किसान' जॉईन करणार.
सकाळच्या
सर्व तालुका वार्ताहरांना तनिष्का व्यासपीठासाठी वर्गणीदार/सदस्य गोळा
करण्याचे उद्दीष्ट्य.जास्तीत-जास्त वर्गणीदार/सदस्य व्हावेत म्हणून
अधिकाधिक वार्ताहर नेमण्याचे धोरण. वार्ताहर नेमण्याची जाहिरात काढली.
धुळ्यासाठी तीनदा जाहिरात देवूनही उपसंपादक/वार्ताहर म्हणून एकही अर्ज
नाही.
*'पुण्यनगरी'ला जळगाव/धुळ्यात माणसे मिळेनात. कार्यकारी संपादकासाठी शोध सुरू. अनिल पाटील, अनिल चव्हाण यांना संधी नाही.
* जळगावात 'लोकमत'लाही माणसे मिळेनात. 'देशदूत'मध्ये अस्वस्थतेचे वारे. १६ कर्मचारी पडले बाहेर. दोन महिने पगार नाही.
*निखिल
वागळे यांच्या मनमानीमुळे 'आयबीएन-लोकमत'मधील मंडळी हैराण. चाटूगिरी
करणारेच अधिक चमकवले जात असल्याने नाराजी वाढतेय. धुपकर-दुसाने यांना झुकते
माप तर आशिष जाधव व त्यांच्या दोघा पंटर्सनाच मोक्याच्या जागा मिळाल्याने
धुसफूस. बायकोसकट सगळी जवळकितील बाजूल पडलेली खोडे चर्चात्मक कार्यक्रमातून
उजवताहेत वागळे. पंटर युवराजचीही अलीकडे केली जातेय सोय.
* वागळे-राजीव
खांडेकर यांच्यावरील हक्कभंगामुळे महाराष्ट्रभर पत्रकारांच्या निषेधबाजीला
उत. मराठवाड्यात पत्रकारावर गुटकासम्राटाने हल्ला चढविला; इतरत्र प्रिंट
पत्रकारावर हल्ले होतात तेव्हा 'टिवटिवे च्यानेली' निषेधाचा सूर तरी आळवतात
का? तेव्हा प्रिंटवाल्यांनो उर बडविणे बंद करा. वागळे समर्थ आहेत. ते
तुमच्या पाठीशी उभे राहतील तेव्हाच तुम्ही मातम मनवा .... राज्यभरातील
प्रिंटमधून उठत असलेला हा सूर !
* महाराष्ट्र टाईम्स
मे महिन्यात जळगावात ब्युरो ऑफिस सुरू करण्याच्या तयारीत. व्यवस्थापक काटे
यांनी दिली जळगावास भेट. जळगावला अकोला/बुलढाणा जोडले गेल्यास मोठे आवृत्ती
सेंटर उभारले जाण्याची शक्यता. धुळे विभागीय कार्यालयामार्फत गुजरात, मध्य
प्रदेशातील मराठी भाषिक प्रांतात मारणार मुसंडी.
* 'मटा' व्यवस्थापनाकडून बेनेट-कोलमन कार्यकारी मंडळास अहवाल सादर. मंजुरी मिळाल्यास 'दिव्य मराठी'पूर्वीच अकोला-विदर्भात उडणार धमाका. इतरत्रही 'दिव्य'पुढे आव्हान उभे करण्याची योजना.
* 'मटा' व्यवस्थापनाकडून बेनेट-कोलमन कार्यकारी मंडळास अहवाल सादर. मंजुरी मिळाल्यास 'दिव्य मराठी'पूर्वीच अकोला-विदर्भात उडणार धमाका. इतरत्रही 'दिव्य'पुढे आव्हान उभे करण्याची योजना.
(विस्ताराने 'विवेकपुराण' लवकरच वाचा)