श्रीमती चौधरी या जास्त भाजल्या असून चेहरा आणि छातीवर हा हल्ला झाला आहे .राज्यात गुटका बंदी असली तरी पूर्णा येथे गुटका सर्रास विकला जातो.त्याविरोधात दिनेश चौधरी यांनी सातत्यान आवाज उठविला.त्यामुळे ज्यांचे आर्थिक हितसंबंध दुखावले आहेत अशा प्रवृत्तीनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
पत्रकारावर अशा प्रकारे ऍसिड हल्ला होण्याची महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील पहिलीच घटना आहे.या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पूर्णा बंदचे आवाहन करण्यात येत आहे.जिल्हा पोलिस प्रमुख आज पूर्णाला भेट देणार आहेत.पूर्णा येथील पत्रकार एस.पीची भेट घेऊन आरोपीला तातडीने अटक करावी अशी मागणी करणार आहेत.पत्रकारांची अकरा वाजता बैठक होत आहे.पत्रकार चौधरी यांच्यावरील हल्लयाचा मनसेने निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती लवकरच नांदेडला जावून जखमी पत्रकाराची भेट घेत आहेत.या संदर्भात गृहमंत्र्यांचीही भेट घेतली जाणार आहे.
दिनेश चौधरी हे 35 वर्षीय पत्रकार एक सामाजिक बांधिलकी जपत निष्टेने पत्रकारिता करणारे पत्रकार म्हणून पूर्णेत ओळखले जातात.त्यांच्यावरील हल्ल्याने पूर्मा येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मागच्या आठवड्यातच सातारा येथील पत्रकार विशाल कदम याला आम आदमी पार्टीच्या मंडऴीनी मारहाण केली होती.ती घटना ताजी असतानाच पूर्णा येथील पत्रकारावर हल्ला झाल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.नव्या वर्षातील अडिच महिन्यातला म्हणजे 65 दिवसातला हा पंधरावा हल्ला आहे.म्हणजे राज्यात साडेचार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला केला जात आहे.गेल्या वर्षी हे प्रमाण पाच दिवसाला हल्ला असे होते.
साभार - उद्याचा बातमीदार
परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील सोलापूर तरूण भारतचे पत्रकार दिनेश चौधरी आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती पऱभणीच्यावतीने परभणी येथे शनिवारी पत्रकारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख या मोर्चाचे नेतृत्व कऱणार असल्याची माहिती पत्रकार हल्ला विरधी कृती समितीच्या पत्रकात देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गुटका बंदी असतानाही पूर्णा शहरात गुटका मोठ्या प्रमाणात
विकला जात होता.त्यासंबंधीची बातमी दिनेश चौधरी यांनी तरूण भारतमध्ये दिली
होती.त्यामुळे संतप्त झालेल्या गुटकाकिंगने चौधरीवर घरात जावून ऍसिडचा
हल्ला केला यात ते आणि त्यांच्यापत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांच्यावर
सध्या नांदेडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.महाराष्ट्रात
पत्रकारावर ऍसिड हल्ला होण्याची ही पहिलीच घटना असल्याने पत्रकार हल्ला
विरोधी कृती समितीने याची गंभीर दखल घेत मोर्चाचे आयोजन केले आहे.या
मोर्चात मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे
आवाहन एस.एम.देशमुख.किरण नाईक,आसाराम लोमटे,हेमंत कौसडीकर,अशोक कुटे आदिंनी
केले आहे.
महाराष्ट्रात सातत्याने पत्रकारांवर हल्ले होत आहेत.राजकीय पक्षाच्या
कार्यकर्त्यांकडूनच हे हल्ले होतात. चार दिवसांपूर्वी सातारा येथे आम
आदमीच्या कार्यकर्त्यानी तेथील पत्रकारावर हल्ला केला होता.पुर्णेतील हल्ला
प्रकरणातही शहर कॉग्रेसच्या अध्यक्षाचा हात असल्याचे पुढे येत आहे.राजकीय
पक्षच हल्ले करीत असल्याने सरकार कायदा करायला तयार नाही.विरोधकांनी
जेवढ्या प्रभावीपणे हा विषय लावून धरायला हवा तेवढ्या प्रमाणात तो धरला जात
नाही.त्यामुळे महाराष्ट्रात दर चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत
असतानाही सरकार कायदा करीत नाही त्यामुऴे कायद्यासाठीची ही लढाई अधिक तीव्र
कऱण्यात येणार असल्याची माहितीही पत्रकात देण्यात आली आहे.