शिवाजी शिर्केच्या राजीनाम्याचे गुढ काय?

नगर - देशदूत म्हणजे शिवाजी शिर्के आणि शिर्के म्हणजे देशदूत असे गणित जुळले असताना, शिवाजी शिर्के यांनी एक मार्च रोजी देशदूतच्या संपादकपदाचा राजीनामा दिला. गेले काही दिवस शिर्केच्या राजीनाम्याची दबक्या आवाजात चर्चा होती, मात्र या चर्चेला दुजोरा मिळताच,बेरक्याने ब्रेकिंग न्यूज दिली.त्यानंतर नगरसह शिर्केंच्या चाहत्यात खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या  सारडा शेठचे अगोदरच सार्वमत नावाचे दैनिक नगरमध्ये सुरू होते. मात्र तीन वर्षापुर्वी देशदूतची  नगर आवृत्ती काढून त्यांनी एकप्रकारे धाडस केले.लोकमतच्या मुशीत तयार झालेला शिवाजी शिर्के संपादक म्हणून या दैनिकाला मिळाला.नविन बातम्या, वेगळ्या विषयावरील कव्हरस्टोरी देवून शिर्केनी देशदूत नावारूपास आणला. एस.पी.कृष्णप्रसादच्या काळात देशदूतने चांगली भूमिका निभावली, इतकेच नाहीत तर लांडे खून प्रकरणात खोतकर, कर्डिले या बड्या धेंड्याच्या विरोधात मोहीम उघडली.या बातम्यांमुळे शिर्केना खूप त्रास झाला,मात्र सारडा शेठने एकदाही शिर्केंची चौकशी केली नाही, किंवा बळ दिले नाही.वर्धापनदिनास कोटीच्या घरात जाहिराती देवूनही कधी अभिनंदन केले नाही.
खप कमी करून जास्त जाहीराती मिळविण्याचा फंडा सारडा शेठचा, मात्र हे गणित पचत नसल्यामुळे शिर्के नाराज होते.एवढेच नाही तर मार्केटींग, जाहिरात यासाठी संपादकालाच पळापळ करावी लागत होती. त्यात शिर्केंना दोनदा हृदय विकाराचा झटका येवून गेला होता.धावपळ त्यांना सहन होत नव्हती.
तीन महिने पगार नाही
देशदूतच्या कर्मचा-यांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार झालेला नाही. सारडा शेठ पगार पाठवायला तयार नाहीत. नगरमध्यचे कमवा आणि पगारी करा, हा त्यांचा अट्टाहास. मात्र हे गणित जुळत नव्हते. त्यात सध्याचे ऑफीस परवडत नसल्याने ते हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. कर्मचारी पगारीसाठी शिर्केकड खेटे घालत होते, आणि सारडा शेठ हात झटकत होते, तेही शिर्केच्या राजीनाम्याचे कारण सांगितले जात आहे

जाता - जाता :
 १) शिर्केच्या राजीनाम्यानंतर नगरमध्ये देशदूतला संपादक मिळत नाही, त्यामुळे कर्मचारी कपात करून, देशदूत सायंदैनिक करण्याच्या हालचाली चालू आहेत.त्यामुळे पेजची संख्या कमी होणार आहे.
२) शिवाजी शिर्के हे आता कोणत्या वृत्तपत्रात जाणार, हे अजूनही कळले नाही.मात्र दुसरे चांगले निमंत्रण येईपर्यंत ते आराम करणार आहेत.