
.....................................
'दिव्य मराठी'च्या अकोला युनिटच्या हालचाली गतिमान. जळगावमधील वरिष्ठ व्यवस्थापक संजय यादव (8390903072) यांना युनिट हेड म्हणून बढती मिळाल्याची अकोल्यात चर्चा.
....................................................................
भास्कर डॉट कॉममधून चौघांचा राजीनामा :
भास्कर डॉट कॉममधून अनेक जणांनी एकाचवेळी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यातील चौघांची पक्की खबर 'बेरक्या'कडे आली आहे. भोपाळ मुख्यालयात कार्यरत राजीव सिंह आणि शोभा यांनी अमर उजाला डॉट कॉम जॉईन केले आहे. मनीष कुमार ने नई दुनिया इंदूर तर कौशी प्रताप सिंह यांनी राजस्थान पत्रिका जॉईन केले आहे.
दैनिक भास्करचे नॅशनल हेड कमलेश सिंग प्रतिस्पर्धी दैनिक 'दबंग दुनिया'मध्ये एडिटर इन चीफ
दैनिक भास्करचे नॅशनल हेड असलेले कमलेश सिंग यांनी पदाचा राजीनामा दिला असून ते प्रतिस्पर्धी दैनिक 'दबंग दुनिया'मध्ये एडिटर इन चीफ म्हणून रुजू होत आहेत. त्यासाठी 'दबंग'च्या मालकांनी संपादक पंकज मुकाती यांना इतरत्र बदलीवर पाठवून ती खुर्ची खाली केली आहे. कमलेश सिंग यांना एका महिन्याच्या पगारापोटी २ लाख रुपये प्रमाणे वर्षभराचा पगार आगावू दिले गेल्याचीही चर्चा आहे.
आईच्या अंत्यसंस्काराची सुट्टी घेतल्याने 'भास्कर'ने 15 दिवसांचे वेतन कापले
भास्कर समूहातील अंबाला (पंजाब) येथील आवृत्तीत कार्यरत सीनिअर रिपोर्टर आशिष श्रीवास्तव यांच्या आईचे निधन झाले म्हणून त्यांना १५ दिवस कामावर जाता आले नाही. १५ दिवसांनंतर ते पुन्हा कामावर आले तर संपादक नरेंद्र अकेला यांनी त्यांचे १५ दिवसांचे वेतन कापल्याची धक्कादायक बाब समजली. प्रशासनानेही त्यांचे वेतन कापले. संपादकांकडून रजा मंजूर करवून न घेता कामावर गेले म्हणून श्रीवास्तव यांचा पगार कापला गेला. या धक्क्यानंतर श्रीवास्तव यांनी तडकाफडकी राजीनामा दिला व ते 'आज समाज' दैनिकात रुजू झाले आहेत. संपादक व भास्कर प्रशासनाच्या या अमानवीय आणि माणुसकीला लाजविणारया कृत्याचा पंजाबात सर्वत्र तीव्र धिक्कार केला जात आहे.
'भास्कर'ची नॅशनल न्यूजरूम आता भोपाळऐवजी इंदूरमध्ये
'भास्कर' समूहाच्या दैनिकातील कंटेंटचा आत्मा असलेली नॅशनल न्यूजरूम आता भोपाळऐवजी इंदूरमध्ये शिफ़्ट होणार आहे. नॅशनल हेड कल्पेश याज्ञिक हेही आता इंदूरमध्ये बसणार आहेत. तर भोपाळची जबाबदारी नवनीत गुर्जर सांभाळतील. इंदूरमध्ये सध्या 'भास्कर'चे कार्यालय असलेल्या परिसरातच एक नवी बिल्डींग कंपनीने विकत घेतली असून सध्या तिचे रिनोव्हेशनचे काम सुरू आहे. नॅशनल न्यूजरूम याच नव्या इमारतीत शिफ़्ट होईल. याच कामासाठी कल्पेश याज्ञिक गेले कित्येक दिवस इंदूरमध्येच डेरा टाकून आहेत. तेच या सर्व प्रकियेवर नियंत्रण राखून आहेत. हिंदी मीडियात अशा अफवा होत्या की, कल्पेश याज्ञिक यांचे पंख छटण्यासाठीच व्यवस्थापनाने त्यांना इंदूरला पाठवून दिले आहे. स्वतंत्र नॅशनल आइडियेशन न्यूज रूम तयार करून मालकाने याज्ञिक यांचे खासमखास नवनीत गुर्जर यांच्यावरच त्यांचे पंख छाटण्याची जबाबदारी सोपविल्याचीही अफवा होती. मात्र, तथ्यांची 'बेरक्या'ने जाच केली असता या अफ़वांमध्ये अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले. कल्पेश याज्ञिक यांचे 'भास्कर' समूहात एक अतिविशिष्ट स्थान असून ते आजही अबाधित आहे. या संपादकाने गेल्या तीन वर्षात एकही रजा घेतलेली नाही. उलट समूह संपादक श्रवण गर्ग हे 'नई दुनिया'मध्ये गेल्यानंतर व्यवस्थापनाने याज्ञिक यांना सर्वाधिकार बहाल केले आहेत. त्यामुळेच कमलेश सिंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. ते इंडिया टुडे समूह जॉईन करीत असल्याची चर्चा होती. मात्र, सिंग 'भास्कर'चे प्रतिस्पर्धी दैनिक 'दबंग दुनिया'मध्ये चालले आहेत. सध्या तरी भास्कर समूहात कल्पेश याज्ञिक आणि नवनीत गुर्जर यांचीच चालती व पूर्ण वर्चस्व आहे.