मुंबई - जय महाराष्ट्र चॅनेलने नुकतीच आपल्या स्ट्रींजर
अन रीपोर्टरची बैठक घेतली. सगळ्यां रिपोर्टर सहीत स्ट्रींजरला मोबाईल
हॅंडसेट भेट म्हणून देण्यात आले. हॅंडसेट महागडे नसले तरी हॅंडसेट देणार जय
महाराष्ट हे पहील चॅनल बनलय. तसच सगळ्या स्ट्रींजर अन रीपोर्टरला चांगल्या
पगारी देणार असल्याचे ओफ़ीसने सांगीतलय. खासकरुन स्ट्रींजरची काळजी घेणारे
हे पहीलेच चॅनल असल्याचे दिसून आल. जय महाराष्ट्र चॅनेलच्या जाहिराती करणारे
बॅनर लवकरच संबंध महाराष्ट्रात झळकणार आहेत. राज्यातील सगळ्या शहरात
सुरुवातीपासुन केबलवर जय महाराष्ट्र चॅनल दिसनार आहे. अगदी पहिल्या
दिवसापासुनच जय महाराष्ट्र चर्चेत रहावे असा व्यवस्थापनाचा प्रयत्न
असल्याचे या बैठकीनंतर काहींनी बेरक्याला सांगीतल आहे.
या सगळ्या
प्रकारामूळे मात्र अन्य चॅनेलमध्ये खळबळ माजलीय. विशेषत: आय.बी.एन. लोकमत
अन टी.ह्वी. नाईनच्या स्ट्रींजरना तुलनेने फारच कमी पगार मिळतो. त्यामुळ या
दोन्ही चॅनेलचे स्ट्रींजर सध्या अस्वस्थ आहेत. बेरक्याला मिळालेल्या
माहीतीनुसार अनेक स्ट्रींजर काम सोडनार असून वर्तमानपत्राच्या आस-याला
जाणार आहेत. तर काही जण आपले चॅनेल बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे
सध्या अनेक स्ट्रींजर मंडळींनी आपले जिल्हा मुख्यालय सोडुन मुंबई गाठली
आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठी उलथापालथ होणार अस चित्र आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागपूर :विदर्भाच्या प्रश्नांवर ताकदीने भाष्य
करणारे, शांत, संयमी वृत्तीचे लोकमतचे निवासी संपादक मोरेश्वर बडगे काहीच
महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. ३५ वर्षांपासून ते पत्रकारितेत कार्यरत
आहेत. महाराष्ष्ट्राच्या सर्वच प्रश्नांचा त्यांना अभ्यास आहे. त्यांच्या
अनेक लेखांमुळे, बातम्यांमुळे मुंबईच नव्हे तर अनेकदा दिल्लाच्या संसदेलाही
हादरे बसलेले आहेत. आता ते सेवानिवृत्त होणार आहेत. स्वतंत्र विदर्भाचा
मुद्दा त्यांनी आपल्या लेखणीद्वारे जिवंत ठेवलेला आहे.
.................................
नाव सोनूबाई....हाती कथलाचा वाळा
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी उपोषणाला बसलेल्या कास्तकारांविषयी जी काही
अश्लाघ्य वक्तव्ये केल्यावर सगळ्या पेपर्सनी आणि चॅनलनी त्यांना झोडपून
काढले. आश्चर्य
म्हणजे सकाळमध्येही त्यांच्या विरोधात अग्रलेख छापून आला. मात्र शेतक-यांचा
पेपर असा टेंभा मिरवणा-या एग्रोवनने दादाविरोधातल्या बातम्या मिळमिळीत व
बातम्या आतल्या पानी दिल्या. खरे तर या पेपराने बातम्या आणखी अग्रलेखातून
उपमुख्यमंत्र्यांना सोलवटून काढले पाहिजे होते. सकाळचे आणि
उपमुख्यमंत्र्यांचे
संबंध असूनही सकाळ त्यांना झोडपू शकतो तर हे का नाही? एरवी फुटकळ विषयावर मोठाल्या बातम्या आणि वायफळ अग्रलेख
लिहिणारे संपादक बिनकण्याचे व भित्रट असले पाहिजेत.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मुंबई - लोकसत्ताचे डेप्युटी एडिटर प्रशांत दीक्षीत यांचा लोकसत्ताला रामराम...दिव्य मराठीत याच पदावर रूजू...