'सकाळ' पुणेच्या निवासी संपादकपदी नंदकुमार सुतार

पुणे - दै. 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीच्या निवासी संपादकपदी नंदकुमार सुतार यांची नेमणूक झाली आहे. त्यांनी सोमवारी पदाची सूत्रे स्वीकारली.

"सकाळ' माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी सुतार यांच्या नियुक्तीची घोषणा केली, "सकाळ' (पुणे)चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी त्यांचे स्वागत केले. सुतार हे 22 वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. यापूर्वी ते दै. "पुढारी'च्या पुणे व नगर आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी पाच वर्षे कार्यरत होते. त्यांनी पत्रकारितेची सुरवात "सकाळ'मधूनच प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून केली. त्यांनी दै. "एकमत', दै. "लोकमत' या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर इत्यादी ठिकाणी काम केले. विज्ञान व तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान आणि समाजकारण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.