दिव्य मराठीच्या मुलाखतीसाठी सकाळचे सर्वजण हजर

अमरावती - दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकरच सुरू होत आहे. या आवृत्तीच्या अमरावती ब्युरो कार्यालयासाठी रविवार ( दि.19 मे ) रोजी स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी मुलाखती घेतल्या.नागपूर रोडवरील हॉटेल गौरी इनमध्ये पार पडलेल्या या मुलाखतीसाठी सकाळचा सर्व संपादकीय चमू हजर हजर होता.यावरून सकाळमध्ये किती असंतोष खदखदत आहे,याची प्रचिती आली.
दिवसभरात जवळपास 40 जणांनी मुलाखती दिल्याचे सांगण्यात आले.मुलाखती देणाऱ्यामध्ये सकाळचे सात जण, लोकमतचे दोघे, पुण्यनगरीचे तिघे उपस्थित होते.अमरावती ब्युरो चिफसाठी सकाळचे सुरेंद्र चापोरकर, सामचे माजी प्रतिनिधी संजय पाकोडे, लोकमतचे माजी जिल्हा प्रतिनिधी कुमार बोबडे, तरूण भारतचे जिल्हा प्रतिनिधी शिवराय कुलकर्णी आदींनी मुलाखती दिल्या.ब्युरो चिफ पदावर सकाळचे सुरेंद्र चापोरकर यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुलाखतीसाठी सकाळच्या संपादकीय विभागाचे सातहीजण उपस्थित होते.दोन प्रुप रिडरही सोबत आले होते.याचा अर्थ सकाळमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून येत असून, आता दिव्य मराठीत सकाळच्या किती जणांची वर्णी लागते,याकडे लक्ष वेधले आहे.

ता.क. - स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी मुलाखतीस आलेल्या प्रत्येकास जात विचारल्याने ते जातीयवादी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.