मुंबई - राज्यातील मी मराठीच्या स्ट्रिंजर रिपोर्टरचे गेल्या दीड वर्षापासून मानधन आणि बिले थकली असून, मानधन मागितले असता,काम करू वाटले करा अन्यथा साडून द्या, अशी धमकी मँनेजमेंटकडून दिली जात आहे.त्यामुळे या स्ट्रिंजर रिपोर्टरना भिक नको पण कुत्रा आवर म्हणण्याची पाळी आहे.
राज्यात मी मराठीचे राज्यात जवळपास 40 स्ट्रिंजर रिपोर्टर आहे.त्यांचे दोन वर्षापासून मानधन आणि बिले थकली होती.बेरक्याने मध्यंतरी वृत्त दिल्यानंतर त्यांना सहा महिन्याचे मानधन मिळाले.आता उर्वरित दीड वर्षाचे मानधन मागितले असता,काम करू वाटले तर करा अन्यथा सोडून द्या म्हणून सांगितले जात आहे.
मी मराठीची मालकी पुर्वी कांचन अधिकारी यांच्याकडे होती.गेल्या वर्षभरापासून महेश मोतेवार यांच्याकडे आहे.मोतेवारचे अनेक उद्योगधंदे आहेत.मी मराठी केवळ एक दबाबतंत्र आहे.मोतेवार यांना स्ट्रिंजर रिपोर्टरच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.काही दिवसांपुर्वी पाच स्ट्रिंजर रिपोर्टरना कामावरून काढून टाकण्यात आले.आता अनेकांवर टांगती तलवार ठेवण्यात आली आहे.
मी मराठी 24 तास बातम्या सुरू करणार, ही केवळ अफवा आहे.त्यात कसलाही दम नाही.