मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेले जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सध्या तरी फ्लॉप झाले आहे. मंदार फणसे, तुळशीदास भोईटे, रवी आंबेकर हे त्रिकुट काही तरी चमत्कार करेल,ही अपेक्षा फोल ठरली आहे.
जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरू होवून एक महिना होत आहे.हे चॅनल व्हिडीओकॉन डीटीएच सोडून अन्य डिशवर दिसत नाही.तसेच अनेक शहरात केबलवरही दिसत नाही.चॅनल सुरू होण्यापुर्वी सर्व केबल ऑपरेटरशी करार करणे गरजेचे असताना,ते न केल्याने हे चॅनलचे बहुतांश लोकांना अजूनही दर्शन झाले नाही.मार्केटींग आणि वितरणमध्ये हे चॅनल कमी पडले आहे.
ज्यांना चॅनल दिसले तेही समाधानकारक नाहीत.पिच्चर क्लॉलिटी अत्यंत डल्ल आहे.ग्राफीक्स बरोबर नाही.त्यामुळे हे चॅनल लोकांच्या मनात भरत नाही.तसेच मुळ म्हणजे बॅकअप नाही.
पुर्वीचे स्टार माझा आणि आताचे एबीपी माझाला स्टार न्यूजचे आणि आता एबीपी न्यूजचे बॅकअप आहे.झी २४ तासला झी न्यूजचे,आय.बी.एन.लोकमतला आयबीएन ७ चे बॅकअप आहे.मात्र जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला कोणाचेही बॅकअप नाही.त्यामुळे हे चॅनल अडचणीत सापडले आहे.जोपर्यंत एखाद्या नॅशनल चॅनलचे बॅकअप मिळत नाही,तोपर्यंत या चॅनलला मोठा सामना करावा लागणार आहे.
ऑफीसमधील वातावरण वरवर चांगले असले तरी दोन गटांत शीतयुध्द आहे. टीव्ही ९ मधून आलेल्या तुळशीदास भोईटे आणि त्यांच्या समर्थकांना भडक बातम्या तर आय.बी.एन.लोकमतमधून आलेल्या मंदार फणसे, रवी आंबेकर यांना शांत बातम्या हव्या आहेत.नेमक्या कशा बातम्या द्याव्यात,या कात्रित हे चॅनल सापडले आहे.
टेक्नीकल स्टॉफ अत्यंत रदाड आहे.८ ते १० हजार रूपयांवर काही टेक्नीकल स्टॉफ नियुक्त करण्यात आला आहे.त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा कशा पुर्ण होतील.काही कॅमेरामनही चांगले नाहीत.एखाद्या लग्नाची शुटींग करणारे कॅमेरामन भरती करण्यात आले आहेत.रिपोर्टरवी टीम चांगली असली तरी टेक्नीकल स्टॉफ चांगला नसल्यामुळे स्टो-या चांगल्या लागल्या जात नाहीत.
रात्री ९ वाजता संपादक मंदार फणसे यांचा लक्षवेधी कार्यक्रम असतो.मंदारचे संभाषण कौशल्य चांगले नाही.त्यांचे सारखे - सारखे आं...आं...हे पॉज घेणे लोकांना खटकते. हा कार्यक्रम अत्यंत रटाळ असतो.काही न्यूज अँकर सोडले तर अँकरही चांगले नाहीत.
या सर्व बाबीमुळे जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये गेलेले अनेकजण नाराज झाले आहेत.अगोदरच चॅनलची मोठी बदनामी झाली आहे.त्यात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अनेकांची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी झाली आहे.
जाता - जाता : राज्यात अनेक महत्वाच्या ठिकाणी ब्युरो नेमण्यात आले आहेत.मात्र त्यांना अजूनही ऑफीस करून देण्यात आलेले नाही.तसेच टेलिफोनची लीज लाईन उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.त्यांना फुटेज FTP करून पाठवावे लागतात. गंमत म्हणजे दिल्लीच्या स्टोऱ्या आणि फुटेज तर कुरियरने पाठविले जाते.मग कशा लागतील अर्जंट स्टोऱ्या...
..............................
मुंबई - मंदार फणसे यांनी सुरू केलेल्या भारत 4 इंडिया मधील कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यापासून पगार नाही.
कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून फणसे गेले जय महाराष्ट्रात आणि आता भारत 4 इंडिया मधील कर्मचारीही करणार जय महाराष्ट्र...