आमच्या ब्लॉगवर
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध ‘नाशिक गांवकरीची अवस्था बिकट‘ या मथळ्याखालील
मजकुराबाबत गांवकरी व्यवस्थापनाने 'बेरक्या'ला पाठविलेला खुलासा -
आमच्याकडून सोडून गेलेले कर्मचारीच ‘गांवकरी’ची बदनामी करत आहेत. ‘गांवकरी’ने आजपर्यंत सर्व कर्मचार्यांना आपले समजून त्यांच्याशी दीर्घकाळ बांधिलकी जपली आहे.
आपल्या ब्लॉगवर असेही म्हटले आहे की इतर दैनिकांच्या तुलनेत गांवकरी स्पर्धेत मागे पडला आहे, असे काही नसून आम्ही नवनवीन आव्हानांना समोर ठेऊन वेगवेगळे प्रयोग करत आहोतच. आमची प्रतिस्पर्धी दैनिके नाशकात आली असली तरी ‘गांवकरी’ बद्दल वाचकांना विशिष्ट प्रेम आहेच. लेआऊट सुधारून प्रिंटींगही चांगली करण्याचा प्रयत्न करत आहोत. पगाराच्या बाबतीत म्हटले तर आर्थिक संकटात सापडल्याने थोडे अनियमित आहेत, पण तेही नियमित करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
पीटीआय सांभाळणारे अनिल दिक्षीत यांना मोठ्या पागाराची नोकरी हवी असल्याने ते सोडून गेले, दीपक रत्नाकर हे दररोज 2-3 तास उशिरा कामावर येत होते. उशिरा येऊन अंकालाही उशीर करत होते. सतत कर्मचार्यांशी उद्धट बोलणे, कर्मचार्यांना नाहक त्रास देणे असे प्रकार ते करत असल्याने ‘गांवकरी’ व्यस्थापन त्यांच्यावर तीव्र नाराज होते. त्यांना समज देऊनही त्यांच्या वर्तनात फारसा बदल झाला नाही. महापालिकेचे वार्ताहर म्हणून नियुक्ती केलेल तुळसीदास बैरागी हे वर्षातून निम्मे दिवस गायब असायचे, कामावर यायचे नाहीत. ‘गांवकरी’च्या नावाखाली बाहेर दहशत पसरवायचे. तसेच त्यांच्याकडे लाखो रुपयांची माया असल्याने त्यांना नोकरीची गरज नव्हती. रात्री रात्री बाहेर दंगा करायचे, अशा पद्धतीची पत्रकारिता ‘गांवकरी’च्या परंपरेला हानीकारण ठरत असल्याने त्यांना काम बंद करण्यास सांगितले. संतोष लोळगे हे क्राईमचे रिपोर्टर आहेत पण त्यांची प्रकृती ठिक नाही म्हणून त्यांना आता कामात रस नसल्याने त्यांनी कामावर येणे बंद केले... यात ‘गांवकरी’ व्यवस्थापनाची काय चूक?
दीपक रत्नाकर, बैरागी यांचे गोपनीय अहवाल जर पुढे आणले तर त्यांना कोणत्याही दैनिकात नोकरी मिळणार नाही. ते जरी आमच्याकडे परत येत असले तरी आम्ही त्यांना पुन्हा नोकरी देणार नाही. एवढे लोक सोडून गेले असले तरी ‘गांवकरी’चा अंक दर्जेदार निघत आहे. आम्ही चांगला मजकूरूही देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे इतर दैनिकांचा फारसा आमच्यावर परिणाम झाला नाही.
...........................................................
संतोष लोळगे यांचा खुलासा
दै गांवकरीच्या बातमीत माझ्याबाबत सातत्याने चुकीचा उल्लेख होत आहे...प्रकृती ठीक नसली तरी मी इमानेइतबारे काम करीत होतो मात्र कार्यकारी संपादक तनपुरेच्या कार्यपध्दतीविरूध्द आवाज उठवून मी संपादक वंदनराव पोतनीस यांना सांगून रजेवर आहे.माझा उल्लेख आपण जेव्हा करतात तेव्हा त्यावरील माझा खुलासा टाकणे न्यायाला धरून होईल.
संतोष लोळगे
9850097274
.............................................................
बेरक्या ब्लॉगवर प्रसिध्द झालेल्या बातम्याबाबत संबंधितांना खुलासा करायचा असल्यास त्याचे स्वागतच आहे. मात्र खुलासा नाव आणि सहीसह अधिकृत ई-मेलवरून पाठवावा लागेल.