अकोला मीडियात भूकंप

अकोला - दिव्य मराठीने अकोल्यात पाऊल ठेवताच अनेक घटना - घडामोडी घडत आहेत.मंगळवारी तर भूकंप झाला. लोकमतचे निवासी संपादक प्रेमदास राठोड हे अखेर लोकमतचा राजीनामा देवून दिव्य मराठीत जॉईन झाले आहेत. तर देशोन्नतीचे कार्यकारी संपादक रवी टाले हे लवकरच लोकमतमध्ये जॉईन होतील. राठोड हे दिव्य मराठीचे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त बेरक्याने पंधरा दिवसांपुर्वी प्रसिध्द केले होते.अखेर हे वृत्त तंतोतंत खरे ठरले.
दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकर सुरू होत आहे.टीमची जुळवाजुळव पुर्ण झाली आहे.मात्र निवासी संपादक कोण होणार,याकडे लक्ष वेधले होते. या पदासाठी लोकमतचे गजानन जानभोर आणि सकाळचे श्रीमंत माने यांनी नकार दिल्यामुळे, खांडेकरांपुढे एकच पर्याय होता,तो म्हणजे लोकमतचे प्रेमदास राठोड.
एकीकडे राठोडमुळे लोकमतमध्ये प्रचंड नाराजी होती.त्यामुळे अनेकजण दिव्य मराठीच्या वाटेवर होते.त्यामुळे लोकमत प्रशासनाने राठोड यांना मुंबईला हलवून नागपूरचे सीटी एडिटर गजानन जानभोर यांच्याकडे तात्पुर्ती जबाबदारी सोपवली.त्यामुळे अजय डांगे आणि राजू चिमणकर वगळता,एकीही संपादकीय स्टॉफ फुटला नाही.
नंतर राठोड यांनी कौटुंबिक अडचण सांगितल्यानंतर लोकमत प्रशासनाने त्यांना हॅलोचे ग्रामीण हेड करून, अकोल्यात एम.आय.डी.सी.कार्यालयात बसविले.त्यामुळे राठोड नाराज झाले.ते गेल्या काही दिवसांपासून खांडेकरांच्या संपर्कात होते.बेरक्याने तसे वृत्त दिले होते. अखेर राठोड लोकमतचा राजीनामा देवून, दिव्य मराठीत जॉईन झाले आहेत.त्यांच्या पदाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी,त्यांना दिव्य मराठीत निवासी संपादकपद दिले जातील...त्यामुळे आता देविदास लांजेवार यांचा विषय आता संपला आहे.बहुतेक लांजेवरवर वृत्तसंपादक पदाची जबाबदारी सोपविण्यात येईल,असा अंदाज आहे.
राठोड यांच्या आगमनामुळे लोकमत सोडून दिव्य मराठीत आलेले अजय डांगे आणि राजू चिमणकर यांची मोठी गोची झाली आहे.कारण दोघांनी केवळ राठोडच्या छळाला कंटाळून,लोकमत सोडले होते.तसेच दिव्य मराठीच्या वाटेवर असलेला लोकमतचा स्टॉफही आता लोकमतमध्ये थांबेल.लोकमतचा अखेर सुंटीवाचून खोकला गेला आहे.
अकोल्यात आणखी एक भूकंप घडला आहे. देशोन्नतीचे कार्यकारी संपादक रवी टाले हे प्रकाश पोहरे यांचे फॅमिली मेंबर.मात्र केवळ एका बिलामुळे पोहरेंनी त्यांना केले.त्यामुळे टाले हे राजीनामा देवून घरी बसले होते. टाले देशोन्नती परत येणार का, की अन्य वृत्तपत्रात जाणार,अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती.अखेर टाले लवकरच लोकमतचे जॉईन होतील.त्यांची आणि मोठ्या राजेंद्र बाबूंजींची मुंबईत भेट झाली असून,टाले लवकरच लोकमतमध्ये दिसतील.त्यांना लोकमतमध्ये निवासी संपादक किंवा कार्यकारी संपादक पद दिले जातील.

ता.क.-  प्रेमदास राठोड यांना बंपर लॉटरी...लोकमतपेक्षा डी.एम.मध्ये दुप्पट पॅकेज...शिवाय फिरण्यास ड्रायव्हरसह चार चाकी गाडी आणि राहण्यास बंगला....

* अकोला - प्रेमदास राठोड दिव्य मराठीत गेल्याने लोकमतची लढाई झाली सोपी....गजानन जानभोरला रवी टालेंची साथ मिळाल्यामुळे लोकमतच राहणार नं.1...कोई शक?