मुंबई मराठी पत्रकार संघाच्या शनिवारी झालेल्या
द्विवार्षिक निवडणुकीत देवदास मटाले यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड
झाली, तर उपाध्यक्षपदी विजयकुमार बांदल व शशिकांत सांडभोर निवडून आले.
शनिवारी झालेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत कार्यवाहपदी
प्रमोद तेंडुलकर यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले, तर विश्वस्त
म्हणून वैजयंती आपटे व कोषाध्यक्षपदी दीपक म्हात्रे यांची निवड झाली.
संघाच्या कार्यकारिणीवर विष्णू सोनावणे, नेहा पुरव, सत्यवान ताठरे,
आत्माराम नाटेकर, प्रशांत नाडकर, दीपक परब, सदानंद शिंदे, सतीश खांबेटे व
अरुण कुलकर्णी यांची निवड झाली. निवडून आलेले मंडळ दोन वर्षांसाठी कार्यरत असेल.
विद्यमान कार्यकारी मंडळ