मीडियाची विश्वासर्हता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, त्याची ही दोन उदाहरणे...
१. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.नंतर त्याचा खर्च राज्य सरकारने करणे अपेक्षित होते.मात्र हा खर्च मुंबई महापालिकेने करावा,असे निर्देश राज्य सरकारने दिले.महापालिका पाच लाखाचा धनादेश काढणार,ऐवढ्यात लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये बातम्या झळकल्या...उध्दव ठाकरे यांना पाच लाख रूपये कमी आहेत का,मुंबईत राहणा-या लोकांच्या खिशातून खर्च कशासाठी, असा एकूण त्यात सार होता.
नंतर अशाच रितीच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक चॅनलवाल्यांनी दिल्या...शेवटी उध्दवजी खिन्न मनाने पाच लाखाचा धनादेश मुंबई महापालिकेकडे सुपूर्द केला.मात्र मुंबई महापालिकेने हा धनादेश उध्दवजींना परत करून, ही जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले,मात्र उध्दवजींनी हा धनादेश परत न घेता,या पैश्यातून ज्यांनी खोट्या बातम्या दिल्या,त्यांना पुरस्कार देण्याची सुचना मांडली. उध्दवजीची ही गांधीगिरी सर्व मीडियावाल्यांना आत्मपरिक्षण करणारी आहे.
२. चित्रपट अभिनेता शाहरूख खान याने गर्भलिंग चाचणी केल्याची बातमी मिड- डे या इंग्रजी वृत्तपत्राने दिली होती,नंतर हीच बातमी अनेक मराठी वृत्तपत्राने दिली. नंतर चॅनलवाल्यांनी ही बातमी चालविली. तथाकथित सामाजिक कार्यकत्र्या वर्षा देशपांडे यांना आयते कुरण मिळाले.त्यांनी खूप मोठी गरळ ओकली.
शहारूख खानने कुठे तरी मला मुलगा होणार आहे,असे वाक्तव्य केले होत,त्यावरून साप,साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार घडला.मात्र शहारूख खान याने हे वक्तव्य कुठे आणि कधी केले होते,याची माहिती कोणाकडेही नव्हती.
प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया, बातम्या देताना खातरजमा केली पाहिजे,मात्र हवेत तिर मारण्याचे प्रकार सुरू झाल्याने मीडियावाले तोंडावर आपटत आहेत...
आपण यास काय म्हणाल ?