बेरक्या विरोधकासाठी निवेदन

समाजाला शहाणपणा शिकविण्याचे काम पत्रकार करीत असतात.हे पत्रकार दररोज समाजातील उणी - दुणी काढून, समाजाचे जणू आम्हीच कैवारी आहोत,असे भासवत असतात.अशा पत्रकारांची उणी - दुणी बेरक्याने कढले तर चुकले कुठे....काही पत्रकारांना तर पत्रकार असल्याची मोठी झिंक असते.दररोज शासकीय आणि राजकीय लोकांना पिडत असतात.या पिडणा-या पत्रकारांना बेरक्याने पिडले तर चुकले कुठे...बातमी देणे हे पत्रकारांचे काम आहे, मात्र बातमी देताना किती कष्ट पडले, हे कोणी सांगत असेल तर त्याच्यासारखा दांभिकपणा आणि भंपकपणा दुसरा असू शकत नाही.त्याचा हा नौटंकीपणा बेरक्याने उघडा केला तर त्याची वैयक्तीक बाब असू शकत नाही.
कोणाला तरी ब्लॉकमेल करायचे,त्याच्याकडून पैसे वसूल करायचे आणि  रात्री मटण आणि दारूवर ताण मारायचा,हे कोणत्या तत्वात आणि चौकटीत बसते. अनेक पत्रकार दिवसा घ्येयवादी आणि रात्री पेयवादी आहेत...त्यांचा ढोंगीपणा उघडकी आणले तर चुकले कुठे ?
मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या स्तंभाकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, मात्र या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. या क्षेत्रात दोन नंबरवाले शिरल्याने,सारा बट्टाबोळ झाला आहे.मग बेरक्याने हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसायचे का ?
बेरक्याची चळवळ मीडियातील घाण साफ करण्याची आहे. आता तुम्ही म्हणाल, हा ठेका बेरक्याला कोणी दिला...ज्यावेळी अधर्म सुरू होतो, त्यावेळी कोणीतरी जन्म घेतो, तसाच बेरक्याचा जन्म झालेला आहे...
बेरक्या म्हणजे नेमका कोण, हे कोडे अनेकांना पडले आहे.बेरक्या आपली ओळख लपवितो, ओळख लपवून कोणालाही लिहिता येते,बेरक्याने आपली ओळख जाहीर करावी असे अनेक प्रश्न आणि त्यावर उपप्रश्न विचारले जातात.
सीआयडी असो की सीबीआय... एकादा गुन्हा उघडकीस आणताना, तपास अधिकारी ओळख लपवत असतात.प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक अधिकारी वेगवेगळी कामे करत असतो.तसेच बेरक्या नेटवर्कचे आहे...बातमी शोधणारे, बातमी लिहिणारे अनेक आहेत, त्यावर नजर ठेवणारे आणि  निर्णय घेणारे अनेक आहेत,शेवटी बातमी प्रसिध्द करणारा एकच आहे....
मग कोणा- कोणाचे नाव द्यायचे...बेरक्या महाराष्ट्रात अनेक आहेत.ते चांगले काम करीत आहेत. चांगले काम करीत असताना,टीका ही होतच असते. तशी बेरक्या नेटवर्कवरही टीका होते,टीका योग्य असेल त्याचे स्वागत करू आणि कामात दुरूस्त करू पण कोणी जाणीवपुर्वक टीका करून,लक्ष विचलित करीत असेल,त्यांना वठणीवर आणावेच लागेल...
हे अभियान गेल्या अडीच वर्षापासून चालू आहे. हे काम करणे काही सोपे नाही. बेरक्याचा शोध लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.त्यात ९९ टक्के अयशस्वी झाले.जो यशस्वी झाला,तो आमची भूमिका ऐकूण गप्प बसला.बेरक्याने आपल्या जीवनात अनेक तत्वे पाळली आहेत.जगाला शहाणपणा शिकविणा-या पत्रकारांची उणी - दुणी काढत असताना तो स्वत: सर्व बाबतीत दक्ष आहे...त्याने सर्व पथ्ये पाळलेली आहेत...
बेरक्या चांगल्या पत्रकारांच्या विरोधात कधीच नाही, आणि राहणार नाही...मात्र ज्यांना खेटायचे आहे,त्यांनी जरूर खेटावे...त्याला उत्तर देण्यास आणि ताळ्यावर आणण्यास बेरक्या सक्षम आहे...

बेरक्या उर्फ नारद

............................................................................................................
''जे जे आपणाशी ठावे, ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळजण'' संत तुकारामांच्या या अभंगाप्रमाणे आपल्याकडील ज्ञान इतरांपर्यंत पोहचून त्यांना शहाणे करण्याच्या हेतूने बेरक्या ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.
................................................... ......................................................
 बेरक्याने आपले सगळीकडे सोर्स निर्माण केलेले आहेत. बेरक्यावर येणाऱ्या बातमीची खातरजमा केली जाते....जर कोणाला वाटले तर बेरक्यावर बदनामीचा खटला दाखल करू शकतो...मात्र गेल्या अडीच वर्षात एकही खटला बेरक्यावर दाखल झालेला नाही.याचा अर्थ बेरक्याची विश्वासर्हता आहे की नाही ? शेवटी आम्ही काही सर्वज्ञ नाही...आमच्याकडूनही काही चुका होवू शकतात..जर कधी चुकलो तर माफी मागायला मागे - पुढे पहाणार नाही...