प्रेमदास राठोड जिद्दीला पेटले,लोकमतच्या दोघांना फोडले...

अकोला - लोकमत सोडून दिव्य मराठीत गेलेल्या प्रेमदास राठोड यांनी, लोकमतचे कर्मचारी फोडणे सुरू केले आहे. त्यांनी औरंगाबाद लोकमतमधील आपल्या दोन समर्थकांना फोडले असून, एकाला औरंगाबादेत तर दुस-याला अकोल्यात आणले आहे.दोघांनाही लोकमतपेक्षा दुप्पट पॅकेज दिले आहे.
एकीकडे दिव्य मराठीत प्रेमदास राठोड यांना टोकाचा विरोध होत असताना, प्रेमदास राठोड यांनी भीष्म प्रतिज्ञा केली आहे की, लोकमतचे अनेक कर्मचारी फोडून दाखवितो. मी जर माणुसघाणा आहे तर, आता लोकमतचे किती लोक जमा करतो, ते पहाच...असेही त्यांनी छातीठोकपणे सांगितले आहे.ज्यांना दिव्य मराठी सोडून जायचे त्यांनी खुशाल सोडून जावे,मी माझी टीम जमा करतो,असेही त्यांनी खासगीत म्हटले आहे.
त्याची सुरूवात त्यांनी आता सुरू केली आहे. लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत डेक्सवर असलेल्या उपसंपादक साजीद पठाण आणि मिलिंद देशपांडे यांना  राठोड यांनी फोडले आहे.पठाणला दिव्य मराठीच्या औरंगाबाद आवृत्तीत तर देशपांडे यांना अकोल्यात आणले आहे.विशेष म्हणजे देशपांडे यांना मुख्य उपसंपादक पद देण्यात आले आहे.
राठोड आता लोकमतचे किती कर्मचारी फोडतात,त्यांची ताकद किती आहे,हे लवकरच कळणार आहे. खांडेकर यांनी राठोड यांना लोकमतचे कर्मचारी फोडण्याची फुल्ल परवानगी दिली असून,अकोला आवृत्ती कसल्याही परिस्थितीत यशस्वी करून दाखविण्याचे चॅलेंज दिले आहे.