सांगलीचा 'वस्ताद' येतोय...

सांगली हे शहर पैलवानासाठी प्रसिध्द आहे.या भागातील अनेक पैलवान महाराष्ट्र केसरी ठरले आहेत.पैलावानांच्या गुरूला वस्ताद म्हटले जाते.(वस्ताद म्हणजे वरचढ हाही अर्थ घेतला जातो आणि एक शिवीही आहे.)हेच नाव घेवून कवठे- महाकांळचे उद्योगपती माधव कुलकर्णी  वस्ताद नावाचा पेपर सुरू करीत आहेत.हे कुलकर्णी मोठे उद्योगपती असून,त्यांचा साखर कारखान्याला मशिनरी पुरविण्याचा उद्योग आहे.ते आबाचे कट्टर समर्थक असल्याचे सांगितले जाते.आबाचा आशिर्वाद असल्यामुळे या पेपरकडे पत्रकारांच्या नजरा वळल्या आहेत.
या वस्ताद पेपरमध्ये या भागातील वृत्तपत्रातील वस्ताद पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या पुढारीतील अनेकजण पुढारी सोडून वस्तादमध्ये जात आहेत.वस्तादमुळे पुढारी खाली होत असून,वस्तादने लॉचिगपुर्वीच पुढारीवर अनेक डाव टाकले आहेत.सकाळचे माजी संपादकीय प्रमुख सुधीर कुलकर्णी यांच्यावर या पेपरची सध्या जबाबदारी टाकण्यात आली आहे.उद्योगपती माधव कुलकर्णी यांनी हा पेपर आपल्या मुलीच्या हट्टापायी काढल्याचे सांगितले जात आहे.किमान दोन वर्षे खर्च देण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.वस्ताद किमान १२ पानी रंगीत वृत्तपत्र असणार असून,सांगली आणि कोल्हापूर अशा दोन आवृत्त्या निघणार आहेत.छपाई कोल्हापूरात होणार आहे.(जिथे व्हिजन वार्ताची छपाई केली जात होती.)
सांगली - कोल्हापूरमध्ये आता या वस्तादमुळे दोन वस्तादमधील लढत पहावयास मिळणार आहे...या लढतीवर बेरक्याचे बारीक लक्ष आहे.