राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला...

जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने राज्यातील स्ट्रींजर रिपोर्टरचे मानधन थकविल्याची बातमी बेरक्याने दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून रिपोर्टंरना धनादेश येण्यास सुरूवात झाली आहे.तरीही अजून बहुतांश रिपोर्टरना धनादेश मिळाले नाहीत.
संतापजनक बाब म्हणजे, त्यांना अत्यंत कमी मानधन देण्यात आले आहे.खान्देशातील एक रिपोर्टर चांगली नोकरी सोडून जय महाराष्ट्रमध्ये आला.त्याला 45 स्टोरीचे बिल केवळ 8500 मिळाले.याचा अर्थ एका स्टोरीला 200 रूपये सुध्दा मिळाले नाहीत.हीच अवस्था सर्व रिपोर्टरची आहे.100 ते 150 किलो मीटर रास्ता कापून, काम करायचे आणि हातात तोकडे मानधन पाहून हे काय,आपण कशासाठी काम करीत आहोत,असा प्रश्न त्यांना पडला आहे.जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा मालक करोडपती आहे म्हणे...दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी दिल्याचा उदो उदो त्यांनी केला होता.मात्र कष्ट करणाऱ्या रिपोर्टरना मानधन देत नाही,दिले तर किती देतो,हे म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला,असे आहे.
मानधन कमी मिळाल्यामुळे स्ट्रिंजर रिपोर्टरमध्ये संताप व्यक्त केला जात असून,अनेक स्ट्रिंजर दुसऱ्या चॅनलच्या शोधात आहेत.