छिंदवाडा : लोकमत
समाचारच्या सातव्या आवृत्तीचे आज छिंदवाडा येथे शानदार सोहळ्यात लोकार्पण
झाले. लोकमत समूहाने या २१ व्या आवृत्तीसह मध्यप्रदेशात पर्दापण केले.
याप्रसंगी
'सामान्य जनतेच्या विकासात राजकारण आणि प्रसिद्धी माध्यमांची भूमिका' या
विषयावरील आयोजित परिसंवादात मान्यवर सहभागी झाले होते. सर्वसामान्य
जनतेच्या विकासाच्या ध्येयापासून प्रसिद्धी माध्यमे आणि राजकारण भटकत
असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
छिंदवाड्याचे आपले एक विश्व आहे.
भोपाळ हे छिंदवाडा बनू शकत नाही; पण छिंदवाडा हे भोपाळ बनू शकते. आताचा
छिंदवाडा ८0 च्या दशकातील राहिलेला नाही. येथील लोकांचे विचार बदलले आहेत.
त्यांना विकासाचे महत्त्व कळले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संसदीय
कामकाजमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले. ते लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख
पाहुणे होते. छिंदवाडा येथून लोकमत समाचार सुरू करण्याचा निर्णय योग्यवेळी
उचललेले योग्य पाऊल असल्याचे ते म्हणाले. पंकज चित्रपटगृहात आयोजित
लोकार्पण सोहळ्यात लोकमत समाचारच्या छिंदवाडा आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय
संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ, राज्यसभेतील विरोधी पक्ष उपनेते रविशंकर
प्रसाद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकमत समूहाचे सीएमडी
व खासदार विजय दर्डा, महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा,
आज तकचे कार्यकारी संपादक पुण्यप्रसून वाजपेयी आणि आयबीएन-७ चे मॅनेजिंग
एडिटर आशुतोष उपस्थित होते. लोकार्पणप्रसंगी लोकमत समाचारचे संपादकीय
संचालक व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण
दर्डा, संपादक विकास मिश्र, प्रॉडक्ट हेड मतीन खान, स्थानिक संपादक देवेश
ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थिती होती.
समाजात समानता
प्रदान करण्याचे प्रयत्न राजकारणातून होत आहेत. प्रसिद्धी माध्यमे या
कार्यात सेतूप्रमाणे भूमिका निभावत आहेत. या कार्यात मीडिया आणि राजकीय
नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
■ लोकांच्या
जीवनात सुधारणा घडवून आणणे हे प्रसिद्धी माध्यमांचे मुख्य ध्येय आहे.
देशाला जोडण्यासाठी हिंदी भाषेला महत्त्व द्यावे लागेल. हे उद्दिष्ट
डोळ्यांसमोर ठेवून मध्यप्रदेशात पहिली आवृत्ती छिंदवाडा येथून सुरू करण्यात
आली, असे लोकमत मीडिया प्रा. लि.चे एडिटर-इन-चीफ विजय दर्डा म्हणाले.
दोन दशकांत परिवर्तन- राजेंद्र दर्डा
■
गेल्या दोन दशकांत राजकारण आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये मोठे परिवर्तन
झाले आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतात राजकारण आणि प्रसिद्धी माध्यमे
यांच्यात सामंजस्य होते. ते आता दिसत नाही, असे महाराष्ट्राचे शालेय
शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले.
देशाप्रति जनतेत नैराश्य नाही - रविशंकर प्रसाद
■
प्रसिद्धी माध्यमे जोपर्यंत लोकांचे दु:ख, वेदना, उत्कंठा समजणार नाही
तोपर्यंत सामान्य जनतेत आपले स्थान निर्माण करू शकणार नाही. देशाप्रति
प्रसिद्धी माध्यमे आणि राजकीय पुढार्यांमध्ये नैराश्य आहे; पण जनतेत ते
दिसत नाही, असे राज्यसभेतील विरोधी पक्ष उपनेते रविशंकर प्रसाद म्हणाले.
मीडियाने निष्पक्ष राहावे - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
जनतेशी संपर्क तुटला -पुण्यप्रसून वाजपेयी
सहकार्याचे
राजकारण संपले आहे. राजकीय नेते आणि जनतेचा संपर्क तुटला आहे. नेते नेहमी
जनतेचा वापर करीत असतात, असे आज तकचे कार्यकारी संपादक पुण्यप्रसून वाजपेयी
म्हणाले.