अकोल्यात वृत्तपत्रांचा रणसंग्राम

अकोला ( सुधाकर खुमकर) - येणार ... येणार म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या एका नव्या वर्तमान पत्राचे अकोल्यात आगमन झाले असून १३ जुलै रोजी अधिकृत सोहळा पार पडल्यानंतर १४ जुलैपासून या मराठी वर्तमान पत्राचा अंक वाचकां'या हातात पडणार आहे. या वर्तमान पत्राने सुरू केलेल्या किंमत युद्घाचा लाभ वाचकांना होणार असून वेतना'या बाबतीत पत्रकारांचेही चांगभले होत आहे.
दैनिक भास्कर समुहाचे मराठी वृत्तपत्र दैनिक दिव्य मराठी'या आगमनाने वर्तमानपत्र सृष्टीत चांगलीच उलथापालथ झाली आहे. या समुहाने जवळपास तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठी पाउल टाकले. औरंगाबादपासून शुभारंभाची मुहुर्तमेढ रोवत नाशिक, जळगाव, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये स्वतंत्र आवृत्या सुरू करून या समुहाने आता विदर्भात पाय ठेवला आहे. 'जाऊ तेथे क्रमांक १ होऊ' असा दावा करणा:या या मराठी वृत्तपत्राने प्रत्येक ठिकाणी दैनिक लोकमतला लक्ष केले. अकोल्यातही दिव्य मराठी विरूद्घ लोकमत असा सामना रंगणार असून १३ जुलै रोजी या सामन्याचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. प्रमिलाताई ओक सभागृहात दुपारी १ वाजता आयोजित या समारंभाला भास्कर समुहाचे चेअरमन श्री रमेशचंद्र अग्रवाल उपस्थित राहणार असून विशेष अतिथी म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.अनिल देशमुख, रोजगार हमी योजना मंत्री ना.नितिन राऊत, खा.आनंदराव अडसूळ, खा.संजय धोत्रे आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती राहणार आहे. पाच पक्षांचे पाच नेते उद्घाटनासाठी बोलावून या नव्या वृत्तपत्राने आपल्याला सर्व पक्ष सारखे असल्याचा संदेश दिला असून कार्यक्रमाची नावाप्रमाणे दिव्य पत्रिका आकर्षण ठरत आहे. निवासी संपादक प्रेमदास राठोड आणि युनिट हेड संजयकुमार यादव यांची पत्रिके'या शेवटी विनित म्हणून नावे असून १४ जुलैपासून वाचकां'या हातात प्रत्यक्ष अंक पडणार आहे.
या वृत्तपत्राची अकोला आगमनाची चाहूल लागताच महिनाभरापूर्वीच लोकमतने जोरदार मोर्चे बांधणी केली. लोकमतनेही आपली किंमत शहरात दोन रूपये केली असून वेगवेगळ्या योजनाही सुरू केल्या आहेत. परिणामी लोकमतचे दहा ते पंधरा हजार अंक वाढले असून त्यां'यापेक्षा जास्त आकडा गाठण्यासाठी दिव्य मराठीची कसरत सुरू आहे. लोकमत'या निवासी संपादकपदी या क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांपासूनचे अनुभवी रवि टाले रूजू झाल्याने लोकमत व्यवस्थापन निश्चिंत असले तरी ही लढाई जोरदार होण्याचे संकेत आहेत. दिव्य मराठीने दोन महिन्यांपासून संपूर्ण शहर पिंजून काढत आपल्या अंकासाठी वार्षिक बुकींग केले. शंभर रूपयात बुकींग करताना दर महिन्याला वितरका'या हातात वाचकाला ६० रूपये द्यावे लागतील. लोकमतचेही बील ६० रूपयेच होणार असल्याने या दोन वर्तमानपत्रांमधील लढत पाहणे मोठे रंजक ठरणार आहे. वाचकांना भरपूर पानांचे हे अंक दोन रूपयांत उपलब्ध होणार असल्याने अन्य वर्तमान पत्रांची स्थिती काय होईल हे सांगणे सध्या कठिण असले तरी १४ जुलै पासून आकडेवारीचा खेळ सुरू होणार आहे.
किंमत युद्घात वाचकांचा फायदा होण्याबरोबरच पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचा:यांचेही भाग्य उजळले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शोषण झालेल्या कर्मचा:यांना या युद्घात आपल्या कामाचे दाम मिळत असल्याने त्यां'यातही आनंदाचे वातावरण आहे. काहींनी माणसे ओढण्यात, फोडण्यात बाजी मारली असून आपली माणसे थांबवून ठेवण्यासाठी काहींची कसरत होत आहे. काहींनी तर युद्घापूर्वी शस्त्रे खाली ठेवली असून या लढाईत आपण पासंगालाही पुरणार नसल्याचे दाखवून दिले आहे.


( सिटीन्यूज सुपरफास्ट)