प्रशांत कोरटकर |
नागपूर -आय.बी.एन.- लोकमत सोडून जय महाराष्ट्रमध्ये गेलेले नागपूर ब्युरो चिफ प्रशांत कोरटकर आणि वाशिमचे स्ट्रिंजर रिपोर्टर मनोज जैस्वाल यांना मिळालेला इंडियन एक्स्प्रेसच्या रामनाथ गोयंका फौंडेशनचा 'रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार' रद्द करण्यात आला आहे.हा पुरस्कार रद्द करण्यामागे निखिल वागळे यांनी शकुनीमामांची भूमिका बजावली.
प्रशांत कोरटकर आणि मनोज जैस्वाल हे आय.बी.एन-लोकमतमध्ये असताना एक सामाजिक स्टोरी केली होती.या स्टोरीला दिल्लीच्या रामनाथ गोयंका फौडेशनचा पुरस्कार काही दिवसांपुर्वी जाहीर झाला होता.तो पुरस्कार वितरणाच्या आदल्या दिवशी रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.यामागे निखिल वागळे यांच्या तक्रारीमुळे हा पुरस्कार रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.शेखर गुप्ता आणि वागळेंच्यात गुप्त चर्चा होवून हा निर्णय घेण्यात आला.कोरटकर आणि जैस्वाल हे आता आय.बी.एन.-लोकमतमध्ये नाहीत,हा पुरस्कार केवळ आय.बी.एन.-लोकमतमुळे मिळाला होता,अशी काव-काव करून,वागळेंनी पुरस्कार रद्द करून आपण किती कोयत्त्या मनाचे आहोत,हे दाखवून दिले.एखाद्याला पुरस्कार देवून,तो रद्द करणे,हे इंडियन एक्स्प्रेसच्या नियमात बसते का,हे विचारण्याची वेळ आली आहे.पुरस्कार देताना या बाबीचा का विचार केला गेला नार्ही,असा प्रश्न विचारला जात आहे.
मनोज जैस्वाल |
प्रिंट मीडियात अनेक जण इकडून - तिकडून जातात...नव्या वृत्तपत्रात काम करीत असताना,जुन्या वृत्तपत्राच्या कामगिरीवर अनेकांना पुरस्कार मिळालेला आहे,मात्र चॅनलला वेगळा नियम लावला जात आहे का?
धन्य ते वागळे आणि धन्य ते पुरस्कार देणारे इंडियन एक्स्प्रेसवाले...
कोरटकर आणि जैस्वाल,तुम्ही इंडियन एक्स्प्रेसच्या रामनाथ गोयंका फौंडेशनच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करा...आमच्यासह राज्यातील पत्रकार तुमच्या पाठीशी आहेत...
टोच्या
1972
मध्ये 'पिंजरा' हा मराठी चित्रपट खूप गाजला होता.हा चित्रपट अजूनही लोक
खूप आवडीने पाहतात...या गाजलेल्या 'पिंजरा' चित्रपटात नायिका संध्याचा एक
डॉयलॉग आहे...
लोक तमाशा फडावर जावून विचारतात, इथं मास्तर आले होते का ?
तेव्हा नायिका आपल्या खास स्टाईलमध्ये म्हणते, अगं बाई,सांगणाऱ्यानं कसं सांगितलं आणि ऐकणाऱ्यांनी कसं ऐकलं ?
सारांश - नागपूरचे प्रशांत कोरटकर यांचा जो पुरस्कार रद्द झाला,त्यावरून संध्याचा हा डॉयलॉग आठवला...वागळे यांनी कसे काय सांगितले आणि शेखर गुप्ताने कसे काय ऐकले...
एक मुर्ख तर दुसरा महामुर्ख....
काय मंडळी बरोबर आहे ना....
लोक तमाशा फडावर जावून विचारतात, इथं मास्तर आले होते का ?
तेव्हा नायिका आपल्या खास स्टाईलमध्ये म्हणते, अगं बाई,सांगणाऱ्यानं कसं सांगितलं आणि ऐकणाऱ्यांनी कसं ऐकलं ?
सारांश - नागपूरचे प्रशांत कोरटकर यांचा जो पुरस्कार रद्द झाला,त्यावरून संध्याचा हा डॉयलॉग आठवला...वागळे यांनी कसे काय सांगितले आणि शेखर गुप्ताने कसे काय ऐकले...
एक मुर्ख तर दुसरा महामुर्ख....
काय मंडळी बरोबर आहे ना....