1) प्रकाश पोहरे यांनी अकोला आवृत्तीच्या संपादकीय विभागाची बैठक घेतली.
माणसं नसल्याने आवृत्तीची झालेली दयनीय अवस्था पाहून पोहरेंनी कपाळावर हात
मारून घेतला. गणेश मापारी पाच ते सहा दिवसांपासून का येत नाही, याचीही
विचारणा केली. मापारींकडून ग्रूप सिमकार्ड परत घेत ते पोहरेंनी स्वतःकडे
घेऊन ठेवले.
२) प्रकाश पोहरे हे कान्हेरी सरप येथील फार्महाऊसवर राहतात. छोटे मालक ऋषी पोहरे यांच्याकडे देशोन्नतीचा कारभार आला आहे.
छोटे मालक निशांत टॉवरवरील एसी कॅबिनमधून बाहेर पडतच नाही. त्यामुळे तब्बल
दहा आवृत्यांचा कारभार स्थानिक आवृत्तीप्रमुखांच्या हाती गेला. बातम्या
मिसिंग, सर्क्युलेशन घसरले तरी त्यांना जाब विचारणारा खमक्या संपादकच आता
देशोन्नतीकडे नाही.
३) देशोन्नती प्रेसवर माणसांचा नुसता तुटवडा
निर्माण झालेला आहे. मेन डेस्कवरील माणसे बातम्या भाषांतरित न करता ई-सकाळ,
महाराष्ट्र टाईम्स, एबीपी माझा, प्रहार, लोकमत, लोकसत्ता, तरुण भारत
यांच्या संकेतस्थळावरून बातम्या कॉपी-पेस्ट करत आहेत. हेडिंग-एण्ट्रो बदलून
बातम्या चोरायच्या व दिवस साजरा करायचा, असा दिनक्रम सुरु आहे.
४) बेरक्याच्या देधडक वृत्तामुळे देशोन्नती व्यवस्थापन हादरले. कोण बेरक्याला इत्यंभूत माहिती देत आहे, याचा शोध सुरु.
५) रवी टाले मुंबई, औरंगाबाद येथील लोकमत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे प्रशिक्षण घेऊन उद्या अकोला कार्यालयात येणार असल्याचे कळते.