झी
24 तास हे मराठीतलं पहिल 24 तास न्यूज चॅनेल. मात्र हे चॅनेल आता न्यूज
चॅनेल राहणार नाही. घसरता टीआरपी लक्षात घेउन पुढील एक-दोन महिन्यात
झी 24 तास इन्फो-एंटरटेन्मेंट चॅनेल होणार आहे. यामुळे अनेक कर्मचारी कमी
होण्याची शक्यता असल्यानं सर्वांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्या कोणत्याही मराठी चॅनेलमध्ये कर्मचा-यांची
कपात करण्यात आली तेव्ही ती बहुजनांच्याच मुळावर आली आहे. आता 'झी
24 तास'मध्येही बहुजनांचीच कत्तल होणार अशी भीती अनेकांना सतावू लागली आहे.
कॉस्ट कटिंगमध्ये सगळी 'अभिजन' मंडळी सुरक्षित राहतील, अशी चिन्हे आहेत.
गेली
14 वर्षे 'झी न्यूज लिमिटेड' अशी बातमीकेंद्रीत असणारी ही कंपनी गेल्या
महिन्यातच 'झी मिडीया कार्पोरेशन लिमिटेड' झालीय. 'वसुधैव कुटुंबकम' हे
ब्रीद स्वीकारत कंपनीने वैश्विक चेहराही धारण केलाय. कंपनीचा सर्वाधिक
टीआरपी व बिझनेस मनोरंजनातून येतोय. त्यामुळे फक्त बातम्यांची वाहिनी असू
नये, हे धोरण कंपनीने मान्य केले आहे. त्याअंतर्गत आता सगळी 'वाट' लागणार
आहे. 'अमुक-तमुक इथून-तिथून झी 24 तास साठी' ऐवजी आता हे बातमीदार
'अमुक-तमुक इथून-तिथून झी मिडीयासाठी' म्हणू लागले आहेत. 'एडिटर नीड नॉट टू
बी जर्नालीस्ट' हे धोरण 'टाईम्स'ने प्रथमत: भारतात स्वीकारले. ते अलीकडेच
'झी 24 तास'ने लागू केलेय. त्यानंतर या चॅनेलमध्ये जातीयवाद निर्माण
झाल्याचा आरोप केला जातोय. याच काळात चॅनेलला उतरती कळा लागली, टीआरपी
घसरला, अनेक बहुजन बाहेर पडले व अभिजनांची मक्तेदारी निर्माण झाली, असेही
आरोप होत आहेत.
मराठीतील सर्वात जुन्या वृत्तवाहिनीतील मंडळींनी उपस्थित केलेले हे काही मुद्दे -
1) पत्रकारितेतला अनूभव शून्य
2) मंत्र्यांशी सलगी असल्याच्या थापा मारणे
3) प्रत्येक सेलिब्रिटीच्या मागे लाळ घोटत फिरणे
4) कोणाच्याही माहितीत नसलेले लोक ऑफिसमध्ये आणून कर्मचा-यांचे डोके खाणे
5) अभिजनांना खास वागणूक आणि प्रगतीच्या संधी देणे
6) बहुजनांनी चॅनेल सोडून जावे अशी परिस्थिती तयार करणे
7) टीआरपीची जबाबदारी स्वत: न स्वीकारता ती कर्मचा-यांच्या माथी मारणे
8) पदाचा उपयोग स्वत:चा पीआर वाढवण्यासाठी करणे.
9) राज ठाकरे मित्र असल्याचे वारंवार सांगणे
10) इतरांच्या कामाचे श्रेय स्वत: घेणे
11) चॅनेलवर आपलीच छाया कशी दिसेल ? याची काळजी घेणे
12) फक्त अभिजनांना चांगली पगारवाढ व बढती देणे
13) वेगळी व रोख-ठोक मते मांडणाकरणा-या बहुजनांना चॅनेलमधून काढणे
असे
13 मुद्दे उपस्थित करून ओळखा पाहू कोण हा संपादक? असा प्रश्न या मंडळींनी
केला आहे. अजूनही अनंत कारनामे आहेत. तूर्तास इतकेच... असेही कळविण्यात आले
आहे.