बारामती – 2014 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काग्रेसच्या खासदार सुप्रिया
सुळे यांच्या मागे पिरपिर लावून अखेर दिल्ली हवाई वारीसाठी ताईंना राजी केल्याने
बारामतीतील अनेक पत्रकार हवेत असून राजकारण्यांनी दिल्लीवारीची आफर आल्याने काही
भामटे पत्रकार सध्या विमानात न बसताच हवेत तरंगत आहेत.
साप्ताहिक काढणार्या मंडळींनी दिल्लीवारीची मागणी केली खरी परंतु आता लोकांचे मत मांडणार्या दैनिकाच्या प्रतिनिधीचा शिरजोर वाढल्याने साप्ताहिकांच्या संपादक मंडळीची तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. राजकारण्याची पंढरी असणार्या गावातील खुद्द पत्रकार मात्र राजकारणाला बळी पडले आहेत.
शरद पवारांना भेटायला मिळणार... हवाई सफर होणार... त्याच बरोबर दिल्लीच्या राजकीय गल्लीबोळांची रितसर माहिती मिळणार असल्याने बारामतीतील सर्वच पत्रकारांमध्ये उत्साह आहे. मात्र फक्त पुणे जिल्ह्यातील 20 पत्रकारांना दिल्लीवारीची संधी मिळणार असल्याने त्यासाठी अनेकांनी लाबिंग सुरू केले आहे.
लोकांच्या मताचा आदर करणारा प्रतिनिधी मर्जीतील पत्रकारांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. मानाला हपापलेल्या बारा-तेरा पत्रकरांची फौज घेऊन त्याने प्रेस क्लब अशी स्वतंत्र चुल मांडली. त्यामुळे बारामतीमधील साप्ताहीक चालवणारी मंडळी चिडून आहेत. आता या धुसफुशीमुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. साप्ताहिकवाल्याची खुली लेखनी 2014 च्या निवडणुकांमध्ये चालली तर आपली खेर नाही. ताईच्या पीएने ही तारेवरची कसरत पाहून पत्रकारांना तुमचे तुम्ही ठरवा. असा उलट सल्ला पत्रकारांनाच दिला आहे. त्यामुळे सर्वांचीच पंचाईत झाली आहे.