२५ हजार द्या आणि चनेल चे नियुक्तीपत्र, ओळखपत्र, आणि बूम घ्या..गर्जा महाराष्ट्र माझा

२४ सप्टेंबर २०१३ ला ठाणे मध्ये गर्जा महाराष्ट्र या न्यूस चनेल चा इंटरव्यू देण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यावर मला पुणे, अमरावती, नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर मधील काही युवा पत्रकार इंटरव्यू साठी आले होते. त्यांना भेटून आनंद झाला मी त्यांना त्यांचे अनुभव विचारले छान वाटले. नंतर चनेल च्या अंकर स्नेहल याने आवाज दिला आणि मला साक्षात्कार साठी बोलावले..मी आत फुल कॉन्फिडेंस नि प्रवेश केला पण आत इंटरव्यू घेण्यासाठी अन्केर बसला होता आणि त्याच्या बाजूला एक लपटोप घेऊन एक सज्जन बसला होता.
मग मला विचारण्यात आले कि काही सोबत आणलय मी लगेच उत्तर दिल हो मी माझा सीवी सोबत आणला आहे पण अंकर नि मला म्हटल सीवी नाही काही चेक, डीडी, कॅश ते आणल का मी लगेच आश्चर्यचकित झालो कि न्यूस चनेल चे लोक पत्रकारीते बद्दल, अनुभवाबद्दल विचारतात पण हे काही उलटच होते मग त्यांनी आपल्या अटी सांगितल्या कि २५ हजार रुपये तुम्हाला सिक्युरिटी डीपोजित चनेल च्या नावाने जमा करावे लागतील, आणि जेव्हा तुम्ही कोणती जाहिरात घ्याल तिथले ६० टक्के चनेल व ४० टक्के रिपोर्टर चे...आणि हो हे चनेल फक्त वेबसाईट वरती सुरु आहे..आणखी एक गंमत तिथले एम डि अनिल महाजन हे ज्या रिपोर्टर चे सिलेक्शन झाले त्यांना आपल्या कंपनीचा खाता नंबर देत होते..या चनेल ला पैसे दिल्यावर आय डि कार्ड व बूम भेटणार होता.
मी म्हटल मला जिल्ह्यासाठी रिपोर्टिंग करायची आहे..हे ऐकून अंकर जाम खुश झाला आणि बाजूला बसलेले सज्जन नि लपटोप वरती जिल्ह्याची माहिती घेतली आणि म्हणाले कि तुमच्या जिल्ह्यात १५ तालुके आहे तुम्ही अस करा कि प्रत्येक तालुक्याचे २५ हजार प्रमाणे ३ लाख ७५ हजार आधी जमा करा अस ऐकल्यावर मी त्वरित नकार दिला. यांना अहोरात्र झटणारे पत्रकार नकोत फक्त पैसे जमा करणारे जाहिरातदार हवेत.
या चनेल चे काही लोक एम के न्यूस मधील आहे.
सोबत या चनेल चे ऑफर लेटर मी आपल्याला पाठवत आहे .

प्रकाश डि. हांडे
चंद्रपूर, (महाराष्ट्र)
9422946649, 8657307999

 prakashhande92@gmail.com



गर्जा महाराष्ट्रकडून आलेला खुलासा

बेरोजगार तरूणांना जाहिरातीतून रोजगाराची सुवर्ण संधी, हाच गर्जा महाराष्ट्र न्यूजचा उद्देश

गर्जा महाराष्ट्र मुंबई -माध्यमांच्या युगात नव्याने पदार्पण करणाऱ्या गर्जा महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीला काळाच्या ओघात अनेक व्यावसायिक आव्हानांना सामोरे जायचे आहे. या वृत्तवाहिनीचा उद्देश हा महाराष्ट्राच्या अस्मितेला राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा आहे. तसेच जनसामान्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवुन देणे हा आहे. समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मराठी भाषा आणि तिचा सन्मान जोपासणे, हे या वाहिनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
गर्जा महाराष्ट्र सर्व प्रेक्षकांना आवाहन करत आहे की, गर्जा महाराष्ट्र न्यूज ही राष्ट्रीय वृत्तवाहीनी लवकरच सुरु होत आहे. यासाठी गर्जा महाराष्ट्र न्यूज च्या कार्यालयात नवोदित पत्रकार तसेच पत्रकारीतेशी निगडीत असलेले अनेक लोक प्रत्यक्ष मुलाखतीसाठी येत आहेत. त्यानुसार गर्जा महाराष्ट्र न्यूज चे संपादकीय मंडळ हे नवोदीत चेहऱ्यांना पत्रकारीतेची संधी देत आहे. सध्या गर्जा महाराष्ट्र न्यूज च्या कार्यालयात अनेक इच्छुक पत्रकारांचे परिचयपत्र (Resume) येत असून त्यांची निवड करुनच त्यांना गर्जा महाराष्ट्र न्यूज च्या परिवारात सामिल करण्यात येत आहे. नवनियुक्त झालेल्या पत्रकारांकडून अचूक व निष्पक्ष पत्रकारिता करण्याची अपेक्षा आहे. तसेच व्यवहारिक दृष्टीकोनातुन जाहिरातींचे टार्गेट पूर्ण करणारे व्यवहारी पत्रकारांचीही नियुक्ती करण्यात येत आहे.
            गर्जा महाराष्ट्राचे जाळे देशभर पसरत असून या नावाचा आधार घेत काही व्यक्ती व संस्था बेकायदेशीररित्या गैरवापर करत असतील तर सर्वप्रथम त्यांचे आयकार्ड तपासावे व त्वरीत आमच्याशी संपर्क साधावा.
       पत्रकारीतेबरोबरच पत्रकारानां रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी गर्जा महाराष्ट्र न्युजने केवळ नवनियुक्त पत्रकारनां गर्जा महाराष्ट्र न्यूज च्या जाहिरात एजन्सी देण्याची अनोखी संधी उपलब्ध करुन दिली आहे. गर्जा महाराष्ट्र वाहिनीचा उद्देश सर्वधर्म समभाव, सर्वसामान्यांना न्याय व बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे हा आहे. मार्केटींग तंत्र अवगत नसणारे पत्रकार आयकार्डचा गैरवापर करून बातमी छापण्याचे किंवा न छापण्याचे गैरव्यवहार करतात. तेव्हा जनतेने सतर्क राहून अशा फसव्या पत्रकारांना न घाबरता आमच्यापर्यंत दूरध्वनी किंवा ईमेल द्वारे त्यांची माहिती कळवा. गर्जा महाराष्ट्र  वाहिनीचे व्यवस्थापन अशा पत्रकारांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करेल.