'बेरक्या उर्फ नारद' हे टोपण नाव का ?

अनेक नामवंत पत्रकार हे आपल्या पेपरमध्ये टोपण नावाचेच लिहित असतात. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव हे चित्रलेखामध्येच सागर राजहंस तर सकाळचे फिचर एडिटर प्रवीण टोकेकर हे ब्रिटीश नंदी या टोपण नावाने लिहितात...राज्यातील असे कितीतरी संपादक आणि पत्रकार टोपण नावाने लिखाण करीत आहेत.
महाराव असतील की टोकेकर सर असतील, हे फार मोठे प्रतिभावंत संपादक आहेत.त्यांची बरोबरी करणे शक्य नाही.त्यांची मी कधी बरोबरी करीत नाही.ते माझ्या गुरूसमान आहेत.यांचा आदर्श ठेवून मी बेरक्या उर्फ नारद या टोपण नावाने गेल्या अडीच वर्षापासून लिखाण करीत आहे.
हे आमचे टोपण नाव असले तरी,लिखाणावर काही वाद उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही कधीच झटकत नाही.पी.आर.बी.अ‍ॅक्टनुसार संपादकीय जबाबदारी आमच्या ख-या नावाची आहे.गेल्या अडीच वर्षात बेरक्याच्या लिखाणावर काही जणांनी हरकती घेतल्या, पण कोर्टात जाण्याची त्यांची हिंमत झाली नाही.
आमच्या लिखाणाबाबात कोणाची अब्रु गेली असेल तर जरूर त्यांनी कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा,त्यावेळी बेरक्या स्वत: कोर्टात हजर होईल,पण बेरक्या स्वत:च्या नावाने पुढे का येत नाही,स्वत:चा चेहरा लपवून पडद्यामागे शब्दाचे खेळ का करतो,असे बालीश प्रश्न विचारणे बंद करावे.जे आमचे फेन्डस् आहेत,त्यांना आमच्याबद्दल तक्रार नाही,मात्र जे आमचे फेन्डस् नाहीत किंवा पत्रकार नाहीत,त्यांनाच ही उठाठेव पडली आहे...
जगाला काय वाटते याचा विचार आम्ही कधी करीत नाही,आम्हाला जे वाटते तेच आम्ही लिखाण करतो,ज्यांना आमचे विचार पटत नसतील त्यांनी सरळ आम्हाला अन्फेन्डस् करावे,पण आमच्या वॉलवर कोणीही पातळी सोडून लिखाण करीत असेल,किंवा शिवराळ भाषा वापरीत असेल तर अशांची आम्हाला गरज नाही.कारण आमच्या फेन्डस् लिस्टमध्ये कितीतरी भगिनी आहेत...त्यां अशा फालतू लोकांचे लिखाण वाचून लज्जीत होत असतील तर अशा फालतू आणि तथाकथित विचारवंतांना ब्लॉक केलेलेच बरे...
बेरक्याने ब्लॉग आणि फेसबुकच्या माध्यमातून एक मोठा मंच तयार केला आहे.हा मंचावर सकारात्मक आणि साधक-बाधक चर्चा व्हावी...कोणी हा मंच घाण करीत असेल तर त्यांना उत्तरे देवून डोके खराब करण्याऐवजी त्यांना ब्लॉक करणे,हा सर्वोत्तम उपाय मी समजतो...
- बेरक्या उर्फ नारद