विलास बडे व अन्य पत्रकारांवर झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. |
यावेळी असे ठरले की,राष्ट्रीय पत्रकार दिनादिवशी म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात काळा दिवस पाळण्यात येईल तसेच जिल्हा आणि तालुका ठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल आणि सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येईल.
याबाबतचा अधिक तपशिल एस.एम.देशमुख लवकरच जाहीर करणार आहेत.