अहमदनगर : दिवाळीचा खमंग
फराळ, सोबतीला आपले कुटुंबिय आणि मित्र परिवार, आकाशकंदील आणि
रांगोळ्यांमुळे निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणात आज पत्रकार आणि त्यांचे
कुटुंबिय रंगून गेले होते. दिवाळी आधीच पत्रकारांनी सामुदायिक पद्धतीने
दिवाळी साजरी केली.
प्रेस क्लबतर्फे आज दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा कार्यक्रम होता. प्रमुख पाहूणे
म्हणून पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, उपमहापौर गितांजली काळे, जिल्हा
पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार मीनाताई मुनोत,
इलेक्ट्रॉनिक्स मिडिया संघटनेचे अध्यक्ष सचिन अग्रवाल, समाजसेवक राजाराम
भापकर गुरुजी आदी यावेळी उपस्िथत होते. प्रेस क्लबचे प्र. अध्यक्ष मन्सूर
शेख यांनी सर्वांचे स्वागत केले. विजयसिंह होलम यांनी प्रास्ताविक केले.
मनीषा इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व
पत्रकारांनी परिश्रम घेतले. शहरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब
उपस्थित राहून फराळाचा आस्वाद घेतला. अशा प्रकारचा आगळावेगळा कार्यक्रम
प्रथमच होत असल्याचे मनोगत पाहुण्यांनी व्यक्त केले. प्रेस क्लबतर्फे
पत्रकारांच्या कुटुंबियांना सुगंधी दिवाळीचे कीट भेट देण्यात आले.