नागपूर : उदय भविष्यपत्राकडून महाराष्ट्रातून अनेक विकासाच्या बाबतीत
अपेक्षा आहेत. मात्र, बातमीदारांना एनजीओचे वर्कर म्हणून काम करण्यास
जुंपण्यात आले आहे. महाराष्ट्राचा विकासाची दवंडी पिटनार्या या
वृत्तपत्रात आता बातम्या कमी आणि तनिष्काच जास्त असल्याने वाचकांची सकाळ
हिरमुसली आहे.याच त्रासाला कंटाळून वाशिम येथील जिल्हा बातमीदार सुनील
काकडे यांनी राजीनामा दिला आहे.
विदर्भातील आणखी काही जिल्हा बातमीदार आणि त्यांचे सहकारी त्रासातून मुक्त होण्यासाठी नव्या संधीच्या शोधात आहेत
उदय भविष्यपत्राच्या डोकेबाजांचे ड्रीम आणि प्रोजेक्ट सांभाळताना आता कर्मचा-यांच्या नाकी नऊ आले आहे. तनिष्का महिला नावाचा व्यासपीठ प्रकार कर्मचा-यांच्या मानगुटीवर बसविण्यात आला आहे. याच त्रासाला कंटाळून आता कर्मचारी भविष्यपत्राची नोकरी सोडून दुस-या वर्तमानपत्रात संधीच्या शोधात आहेत .
मार्च महिन्यात सुरू करण्यात आलेला तनिष्का व्यासपीठाची पहिली बैठक मुंबईत झाली. महिलांकडून सातशे रुपये जमा करून तनिष्का सदस्य तयार करण्यात आले. पण, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने स्पॉन्सर शोधण्यासाठी व्यवस्थापनाकडून बातमीदारांवर दबाव टाकण्यात आला. अनेकजण करियरमध्ये फायदा होईल, अशी अपेक्षा ठेवून मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली. मात्र, यंदा पगारवाढ देखील देण्यात आली नाही. जी देण्यात आली, ती केवळ एक हजार रुपये होती. त्यामुळे मानसिकरित्या डोकेदुखी ठरलेल्या भविष्यपत्राला रामराम ठोकण्याचा इरादा ठेवून असलेल्या बातमीदारांवर आता आता प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये चार तनिष्का सदस्य सातशे रुपये घेऊन करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रायोजक शोधण्याची तंबी देण्यात आली आहे. सोबतच प्रत्येक बूथवर तनिष्का भगिनी तयार करण्यासाठी कर्मचर्याना अक्षरशः धमकाविणे सुरू आहे. या भगिनींची निवडणूक घेऊन घेऊन समांत्तर शासन उभे करण्याचा मानस पुण्यात बसलेल्या उदय भविष्यपत्रांच्या डोकेबाजांचा आहे.