गडचिरोली-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे गडचिरोली जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जमीर
ऊर्फ बबलू हकीम यांना १0 लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अहेरी
पोलिसांनी सात तोतया नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये एका मोठय़ा
दैनिकाचा बामणी येथील बातमीदार तिरूपती चिट्टयालासह एका शिक्षकाचाही समावेश आहे.
या
प्रकरणातील मुख्य आरोपी पोचम कोटा हा पोलिसांच्या तावडीतून रात्री पळून
गेला. पोचम कोटा व बंडू लक्का गावडे या दोघांनी हे कारस्थान रचले, असे
पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच बातमीदार असलेल्या तिरूपती चिट्टयाला
माओवाद्यांचे लेटरपॅड छापण्यास सांगितले. त्याने रवी कारसपल्ली याच्याशी
संधान साधून १५ ते २0 लेटरपॅड छापून घेतले. कारसपल्ली हा बामणी येथील
मानवदयाल शाळेचा शिक्षक असून गावात त्याचा फोटो स्टुडिओ आहे. हकीम यांना
पाठविलेल्या पत्राचा मजकूर याच लेटरपॅडवर लाल अक्षरात कोटा पोचम व बंडू
गावडे यांनी लिहिला. या सर्व आठही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.