हदगावच्या पत्रकारावर हल्ला,हल्लेखोरांवर कारवाई ऐवजी उलट पत्रकारांवर गुन्हा

नांदेड - राजकीय बातमी दिल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर काल चौघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता,पण देशमुख यांनी चाकूचा वार चुकविला आणि बालंबाल बचावले.याप्रकरणी ते हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात गेले असता,संबंधित पोलीस निरीक्षकाने कशाला तक्रार देता,ते अमक्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत,तुमच्यावर अ‍ॅट्रासिटी दाखल होईल,अशी भिती दाखविली मात्र देशमुख यांनी तक्रार नोंदविता की नाही,का वरिष्ठाकडे तक्रार करू असे सुनावल्यानंतर पोलीस निरीक्षकाने देशमुख यांची तक्रार घेतली,पण करायचे तेच केले.
त्यांनी विरोधी पार्टीकडून एकाची फिर्याद घेवून,देशमुख यांच्याविरोधात दरोडा आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.चाकूहल्ला करणा-यावर कारवाई करण्याऐवजी पत्रकार देशमुख यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे.त्यांना कोणत्याही क्षणी अटक होवू शकते.
या निंद्य प्रकाराचा महाराष्ट्र हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून,देशमुख यांच्या विरोधातील फिर्याद मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.